Ambajogai News : पाच दिवसांत तेरा आरोपींना अटक, १९ लाखांचा मुद्देमाल जप्त

अंबाजोगाई पोलिस अॅक्शन मोडवर; अवैध धंद्यांविरोधात मोहीम
Ambajogai News
Ambajogai News : पाच दिवसांत तेरा आरोपींना अटक, १९ लाखांचा मुद्देमाल जप्तFile Photo
Published on
Updated on

Thirteen accused arrested in five days, property worth Rs 19 lakh seized

गोविंद खरटमोल

अंबाजोगाई : अंबाजोगाई पोलीस ठाण्यात नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी अवैध धंद्यांविराधात मोहीम उघडली आहे. दि.१७ ते २१ ऑगस्ट या पाच दिवसात विविध गुन्ह्यात तेरा आरोपींना अटक करत १९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Ambajogai News
Sahastrakund Hydropower Project | लोकप्रतिनिधींचा अट्टाहास: लेकरांच्या तोंडचा घास हिरावण्याचा घाट...

अंबाजोगाई पोलिसांनी दि १७ रोजी अंबाजोगाई शहरातील शेपवाडी परिसरात गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तिर्रट नावाचा जुगार खेळत असताना चौघांना ताब्यात घेत त्यांच्याकडील जवळपास ४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गोलाकार पध्दतीमध्ये अंजिंक्य कदम धनराज चाटे, योगीराज शेप, व लक्ष्मण शेप हे चार जण तिरंट नावाचा जुगार खेळतांना त्यांच्या ताब्यातुन जुगाराचे साहित्य व नगदी ९३०० रुपायाची रोख रक्कम, मोबाईल फोन व मोटार सायकल किमंत अंदाजे ३ लाख ९८ हजार रुपये किंमतीचा मुददेमाल असा एकुन ४ लाख ७हजार रुपायाचा मुद्देमाल जप्त करुन त्यांचे विरुध्द पोलीस स्टेशन अंबाजोगाई शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक १८ रोजी अंबाजोगाई शहरात अवैद्यरित्या विना परवाना बेकायदेशीर रित्या विदेशी दारुची क्रेटा मधुन वाहतुक करीत आहेत. अशी गोपनिय बातमी मिळाल्यावरुन सहा. पोलीस अधिक्षक शिंदे व पोलीस स्टेशन अंबाजोगाई शहर येथील अधिकारी कर्मचारी यांनी करून कार्यवाही करून बालासाहेब माणिक केंद्रे यांचेकडून क्रेटा ही विदेशी दरुच्या बाटल्यासह एकुण १४ लाख ३७ हजार ८४० रुपयाचा माल जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.

Ambajogai News
Nanded News : पंजाबमधील शंभर महिला सरपंचांची येरगीला भेट

दिनांक १९ रोजी अंबाजोगाई शहरामध्ये जुगार रेड केली असता राहुल गायकवाड, असलम मोईम शेख, महेश शिवराम घुले, सोमनाथ सुदाम पवार व बुक्की मालक, चाँद गवळी, गणेश नागरगोजे अन्वर सय्यद यांचेवर जुगार रेड करुन त्यांचे ताब्यातुन जुगार साहीत्य व नगदी पैसे ६० हजार ७९० रुपयाचा माल मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द पोलीस स्टेशन स्टेशन अंबाजोगाई शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

गुरुवारी (दि.२१) रोजी पोलिसांनी नागरगोजेच्या ताव्यातून १८ हजार १८० किमतीचा परदेशी दारू साठा जप्त केला. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या सर्व गुन्ह्यातील १३ आरोपींसह एकूण १९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरील सर्व गुन्ह्यातील कार्यवाही ही पोलिस अधिक्षक नवनित कांवत, चेतना तिडके, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई यांचे मार्गदर्शनाखाली ऋषीकेश शिंदे पोलीस उपअधीक्षक अंबाजोगाई, पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, पोउपनी संजय फड, महादेव आवले, मुकेश खरटमोल, दत्तात्रय इंगळे, अशोक खेलबुडे, पोलीस कर्मचारी हनुमंत चादर, भागवत नागरगोजे, विजय गायकवाड, आचार्य, वडकर, प्रवीण गित्ते यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news