Ambajogai News : ४१°C तापमानात तहानलेले अंबाजोगाई; पाणपोई कुठे गायब?

उन्हाने नागरिक हैराण, तरीही पाणपोईसाठी लोकप्रतिनिधी तथा विविध संघटना उदासीन
Ambajogai News
Ambajogai News : ४१°C तापमानात तहानलेले अंबाजोगाई; पाणपोई कुठे गायब?file photo
Published on
Updated on

Thirsty Ambajogai at 41°C; No Arrangements for Drinking Water Booths Anywhere

अंबाजोगाई : गोविंद खरटमोल सध्या उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाची लाट पसरली आहे. अशाच उन्हाच्या लाटेची झळ अंबाजोगाई व शहरवासीय सोसत आहेत. कधी नव्हे ते अंबाजोगाई शहरातील उन्हाचा पारा ४१ ते ४२ डिग्री पर्यंत जाऊन पोचला आहे. मात्र अशात देखील अंबाजोगाई शहर व परिसरातील राजकीय नेते, त्याचबरोबर शहरात वावरणाऱ्या विविध राजकीय तथा सामाजिक संघटना शहरात कुठेही नागरिकांसाठी पाणपोई उभी करण्याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहेत.

Ambajogai News
Hingoli News : उन्हाळ्यात थंड पाण्याच्या पाणपोई आठवणीतच राहणार

यावरून अंबाजोगाईतील या तथाकथित राजकारणी , तथा संघटना या केवळ राजकारणापूरत्याच उरल्या आहेत की काय असा सवाल नागरिकांतून व्यक्त केला जात आहे. अंबाजोगाई शहरात आजूबाजूच्या गावातील शेकडो नागरिक दररोज आपल्या दैनंदिन व्यवहार तसेच कामकाजासाठी येत असतात. आलेले नागरिक तिव्र उन्हामुळे तहाणेने व्याकुळ झाल्यावर त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

शहरात कुठेच पणपोईची व्यवस्था नसल्याने ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना पाणी विकत घेऊन पिल्याशिवाय पर्याय नसल्याचे आढळून येत आहे. यामुळे अशा नागरिकांच्या कडून नाराजी व्यक्त केल्या जात आहे.

वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेची झळ शहरातील छोटे मोठे व्यापारी, हातगाडीवाले, फेरीवाले यांना देखील उन्हाचा फटका बसल्याचे आढळून येत आहे. अंबाजोगाई शहर हे उंचीवर तथा डोंगर रांगानी वेढलेले आहे. शहराचा पारा आजपर्यंतच्या इतिहासात ४२ डिग्रीपर्यंत कधीच गेलेला नव्हता. त्यामुळे शहरवासीयांना एवढ्या उन्हाची तीव्रता सहन करण्याची सवय कधीच नव्हती.

Ambajogai News
पाटोद्यात पाणी असूनही नागरिकांची भटकंती

त्यामुळे आज वाढलेल्या तापमानाची दाहकता नागरिकांना प्रचंड प्रमाणात जाणवत आहे. अशा परिस्थितीत देखील अंबाजोगाई शहर व परिसरात कुठेच पाणपोई उपलब्ध नसल्याने शहरातील विविध राजकीय, सामाजिक संघटना या फक्त आणि फक्त राजकारण करण्यातच मशगुल आहेत का असा संतप्त सवाल अंबाजोगाई शहरवासीय तथा बाहेरून असलेल्या ग्रामस्थांकडून केला जात आहे.

यापूर्वीच्या काळात अंबाजोगाई शहरातील विविध पक्ष, मित्र मंडळ, सामाजिक संघटना, राजकीय संघटना या शहरातील प्रमुख तथा गर्दीच्या ठिकाणी पाणपोई उभा करून आलेल्या नागरिकांची तहान भागवत असल्याचे दिसून येत होते. मात्र ते चित्र अलीकडच्या काळात लोप पावत चालल्याचे आढळून येऊ लागले आहे. यावरून नागरिकांत एकमेकांप्रती असलेले सामाजिक दायित्व लोप पावत चालले आहे की काय असेच वाटू लागले आहे यात मात्र कुठलीही शंका उरली नाही. बघुयात या बातमीची दाखल घेऊन कुठली तरी राजकीय किंवा सामाजिक संघटना तहानलेल्या नागरिकांसाठी पाणी पिण्यासाठी पाणपोईची व्यवस्था करते का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news