धारूरमध्ये प्रवाशांनी केली बस कंडक्टरला मारहाण

मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
Beed News
धारूर आगारातील बसकंडक्टरला पती-पत्नीने मारहाण केली.Pudhari Photo
Published on
Updated on

धारूर, अतूल शिनगारे : धारूर आगारातील बसकंडक्टरला प्रवाशांनी मारहाण केल्याची घटना घडली. रस्त्यात बस थांबविण्यासाठी घंटी वाजवून बस कंडक्टरला खाली ओढून मारहाण करत दोघा पती-पत्नीने शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी वाहकाच्या तक्रारी वरून मारहाण करणाऱ्या पती-पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतची अधिक माहिती अशी की, मंगळवारी (दि. १५) ऑक्टोबर रोजी धारूर आगाराच्या धारूर-माजलगाव गाडीचे बस कंडक्टर शहादेव मंत्री आणि त्यांचे सोबत ड्रायव्हर श्रीकांत ठोंबरे हे सकाळी १०:४५ वा. धारूर बस स्थानकाच्या बाहेर घेऊन जात असताना गाडीत बसलेला प्रवाशी बन्सी रामकिसन चौरे याने बसची बेल वाजविली; म्हणून कंडक्टर मंत्री त्याला म्हणाले, तुम्ही बेल वाजवु नका. मी बस रोडच्या बाजुला थांबवितो. असे म्हणताच बन्सी चौरे याने चालु बसचा दरवाजा उघडला व बस थांबवण्यास सांगितले त्यामुळे ड्रायव्हर ठोंबरे यांनी तेलगांव रोडवर एस.बी.आय बँकेसमोर रोडच्या बाजुला बस थांबविली. बस थांबताच बन्सी चौरे याने कंडक्टर मंत्री यांना बसमधून खाली ओढून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याची पत्नी संगीता चौरे खाली उतरली आणि तिनेही कंडक्टरचे कपडे फाडुन चप्पलने मारहाण केली. तर बन्सी चौरे यांने उजव्या हाताचा अंगठा धरुन मुरगळला.

Beed News
कांदोळी समुद्रकिनाऱ्यावर महिलेसह दोघा पशुवैद्यकीय डॉक्टरांना मारहाण

दोघे पती-पत्नी कंडक्टर मंत्री यांना रस्त्यावर मारहाण करीत असतानाच्या घटनेचा व्हिडिओ उपलब्ध असून त्यांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करून सरकारी कर्मचाऱ्यास मारहाण केली आहे. या प्रकरणी कंडक्टर मंत्री यांच्या तक्रारी वरून बन्सी चौरे व त्याची पत्नी संगीता चौरे या दोघांच्या विरुद्ध धारूर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण करून कर्तव्यावर असलेल्या कंडक्टरला मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धारूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल अशोक गवळी हे पुढील तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news