कांदोळी समुद्रकिनाऱ्यावर महिलेसह दोघा पशुवैद्यकीय डॉक्टरांना मारहाण

Goa assault case|कळंगुट पोलिसांकडून तिघांना अटक
Goa assault case
कांदोळी समुद्रकिनाऱ्यावर महिलेसह दोघा पशुवैद्यकीय डॉक्टरांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.Pudhari Photo
Published on
Updated on

म्हापसा: पुढारी वृत्तसेवा : कांदोळी समुद्रकिनाऱ्यावर एका महिलेसह दोघा पशुवैद्यकीय डॉक्टर्सना काही बिगरगोमंतकीय तरुणांकडून जबर मारहाण करण्यात आली. या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली.

डॉ. पार्वती जोशी (रा. कंपाल, पणजी, मूळ रा. उदयपूर, राजस्थान) यांनी कळंगुट पोलीस स्थानकात तक्रार दिली. गोव्यातील जनावरांच्या दवाखान्यात काम करणारे पार्वती व तिचे मित्र डॉ. राहुल चौधरी व डॉ. नरेंद्रसिंग फेनीन असे तिघेजण कांदोळी समुद्रकिनाऱ्यावर एका शॅकवर रात्री बाराच्या सुमारास जेवणासाठी गेले होते.

जेवण झाल्यावर सर्वजण किनाऱ्यावर फिरत असताना पुढे चालत असलेल्या पार्वती या महिला डॉक्टरची किनाऱ्यावर असलेल्या बिगर गोमंतकीय तरुणांनी छेड काढली असता तिच्यासोबत असलेल्या डॉ. राहुल व डॉ. नरेंद्रसिंग यांनी त्यांना जाब विचारला. यावेळी त्यांच्यात बाचाबाची होऊन शिवीगाळीवरून प्रकरण हातघाईवर गेले. त्या तरुणांनी त्या तिघांना लाकडी दांडुक्याच्या साह्याने जोरदार हल्ला चढवून जबर मार दिला.

कसेतरी त्यांनी कळंगुट पोलीस स्थानक गाठून मारहाण करणाऱ्या अज्ञात तरुणांविरुद्ध तक्रार दिली. त्यानंतर कळंगुट पोलिसांनी जितेंद्र सिंग भूपेंद्र सिंग (वय 24, रा. उत्तराखंड ) व अरुण कुमार विश्वकर्मा (वय 25, रा. उत्तर प्रदेश ) या दोघा संशयितांना अटक केली. त्यांच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी कळंगुट पोलीस निरीक्षक परेश नाईक पुढील तपास करीत आहेत.

Goa assault case
कोल्हापूर : गोवा बनावटीच्या दारूची तस्करी; चौघांना अटक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news