तरुणास जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण

दोघा भावा विरुध्द ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल
Beed Crime News
तरुणास जातीवाचक शिवीगाळ करून मारहाणFile Photo
Published on
Updated on

केज : केज येथीस टोल नाक्यावरील हॉटेलवर नाष्टा करण्यासाठी थांबलेल्या एका तरुणाला पाठीमागून आलेल्या तरुणाने आणि त्याच्या भावाने जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी दोघा भावा विरुद्ध ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Beed Crime News
धनगर समाजाला अनुसुचित जमातीतून आरक्षण देण्यास एकलव्य संघटनेचा विरोध

या बाबतची माहिती अशी की, गुरुवारी (दि.१७) ऑक्टोबर रोजी कोरेगाव ता. केज येथील रवींद्र शिनगारे हा तरुण केजकडे जात होता. तेव्हा तो सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास रस्त्यातील उमरी फाटा टोल नाक्या जवळ असलेल्या एका हॉटेल मध्ये थांबला होता. त्यावेळी त्याच्या मागून आलेला अमोल तांदळे त्याला म्हणाला की, रवींद्रने महेश तांदळे याच्या कडून घेतलेले एक हजार रु. मागितले. तेव्हा रवींद्र त्याला म्हणाला की, तो महेशला पैसे देणार आहे. असे म्हणताच अमोल याला रवींद्रला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्याचा भाऊ अतुल तांदळे यास फोन करून बोलावून घेतले. त्या दोघा भावांनी रवींद्र शिनगारे याला मारहाण करून त्याचे शर्ट फाडले आणि रवींद्र याच्या मोटार सायकलवर दगड मारून तोडफोड केली. या प्रकरणी रवींद्र शिनगारे याच्या तक्रारी वरून अमोल तांदळे व त्याचा भाऊ अतुल शिनगारे या दोघांच्या विरुध्द केज पोलीस ठाण्यात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना हे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news