धनगर समाजाला अनुसुचित जमातीतून आरक्षण देण्यास एकलव्य संघटनेचा विरोध

Dhangar Reservation | धुळे- सोलापूर महामार्गावर रस्ता रोको
Eklavya organization Dhule-Solapur highway, protest
एकलव्य संघटनेचे अध्यक्ष पवन सोनवणे यांनी कन्नड बायपासजवळ धुळे - सोलापूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले.Pudhari Photo
Published on
Updated on

कन्नड, पुढारी वृत्तसेवा : धनगर समाज हा धनगड या जमातीच्या नावाचा गैर फायदा घेत असून गेल्या अनेक वर्षांपासून वेळोवेळी मोर्चे, आंदोलन, उपोषण करून धनगर समाजाला आदिवासी मध्ये समाविष्ट करण्यात यावे, अशी असंविधानिक मागणी करत आहे. आदिवासी (अनु-जमाती) मध्ये कुणाचीही घुसखोरी न करणे व बिगर आदिवासी यांना आदिवासी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. तसेच धनगर समाजाला अनुसूचित जमाती मध्ये समाविष्ट करू नका, या मागणीसाठी एकलव्य संघटनेचे अध्यक्ष पवन सोनवणे यांनी कन्नड बायपासजवळ धुळे - सोलापूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले.

१६ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने धनगर व धनगड एकच असलेल्या याचिकेवर सुनावणी केली असता धनगर ही जात असून धनगड ही जमात असल्याचे सांगत धनगर समाजाची याचिका फेटाळून लावली आहे. केवळ मतांच्या राजकारणासाठी मुख्यमंत्री यांनी धनगर समाजाला आदिवासी मध्ये समाविष्ट करण्यात येणार असल्याचा जीआर काढण्याचे सांगत तमाम महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या भावनेशी खेळणारा निर्णय घेतला आहे.

हा निर्णय तत्काळ मागे घेण्यात यावा, अन्यथा एकलव्य संघटनेसह महाराष्ट्रातील सर्व आदिवासी संघटना या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरतील. त्यामुळे होणाऱ्या परिणामास आपले शासन जबाबदार राहील. तसेच पंढरपूर येथे सुरू असलेल्या धनगर समाजाच्या उपोषणामध्ये आदिवासी समाजाबद्दल जातीवाचक बेतात वक्तव्य करणाऱ्या पांडुरंग मैलगर यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कायदा अंतर्गत अट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, आदी मागणीचे निवेदन देण्यात आले.

यावेळी अध्यक्ष पवन सोनवणे, जिल्हाध्यक्ष सुनिल ठाकरे, परशुराम सोनवणे, बापू तळवाडे, राजू ठाकरे, कडूबा पवार, लक्ष्मण माळी, किशोर पवार आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थितीत होते.

Eklavya organization Dhule-Solapur highway, protest
छ. संभाजीनगर : विद्युत तारेच्या धक्क्याने रुईखेडा येथील महिलेचा मृत्यू 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news