बीड : मराठा आरक्षणासाठी माटेगावातील तरूणाने जीवनयात्रा संपविली

बीड : मराठा आरक्षणासाठी माटेगावातील तरूणाने जीवनयात्रा संपविली

धोडराई; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाचा विषय राज्यभर पेटला असून या मागणीसाठी आपली जीवनयात्रा संपविण्याचा मार्ग पत्कारणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावं, यासाठी गेवराई तालुक्यातील माटेगाव येथील तरूणाने आज (दि.५) गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आबासाहेब शिंदे ( वय २५, रा.माटेगाव ता.गेवराई जि.बीड) असे या तरूणाचे नाव आहे. आबासाहेब शिंदे हा वेल्डिंगचा व्यवसाय करतो.

आपली जीवनयात्रा संपविण्यापुर्वी आबासाहेब शिंदे याने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती की, मी सुशिक्षित बेरोजगार झालो असून मला आरक्षण नसल्यामुळे नोकरी मिळाली नाही. मी कर्जबाजारी आहे. त्यामुळे माझ्या जीवनात नैराश्य आले आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा बांधवांनी लढा दिला, मात्र त्यातही सरकारने आम्हाला फसविले. म्हणून मी आरक्षणासाठी स्वत:चे जीवन संपवित आहे, असे चिठ्ठीत लिहले आहे. या घटनेची माहिती मिळताच उमापूर चौकीचे विनोद सुरवसे, तुकाराम पवळ, अमोल येळे घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news