Parli News : चार पिढ्यांची प्रतीक्षा संपली; पाचव्या पिढीत लेक आली

परळीत दहिफळे कुटुंबाचा ढोल-ताशांच्या गजरात कन्यारत्नाचा जन्मोत्सव
Parli News
Parli News : चार पिढ्यांची प्रतीक्षा संपली; पाचव्या पिढीत लेक आलीfile photo
Published on
Updated on

The wait of four generations has ended; a daughter has arrived in the fifth generation

परळी, पुढारी वृत्तसेवा : चार पिढ्यांपासून ज्या कन्यारत्नाच्या आगमनाची प्रतीक्षा होती, ती पाचव्या पिढीत अखेर संपली. लेकीच्या जन्माचा आनंद घरापुरता मर्यादित न ठेवता दहिफळे कुटुंबीयांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि स्थातून मिरवणूक काढत कन्यारत्नाचा जन्मोत्सव साजरा केला. मुलगा आणि मुलगी यांच्यात भेद न करता मुलीच्या जन्माचेही तितक्याच उत्साहाने स्वागत केले पाहिजे, असा सामाजिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Parli News
Crime News : चॉकलेटचे आमिष दाखून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

येथील भगवान प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक लिबाजी माधवराव दहिफळे यांचे द्वितीय चिरंजीव ऋषिकेश दहिफळे आणि कल्पना दहिफळे यांच्या पोटी कन्यारत्नाचा जन्म झाला. दहिफळे कुटुंबाच्या मागील चार पिढ्यांपासून मुलीच्या जन्माची प्रतीक्षा होती. त्यामुळे पाचव्या पिढीत लेकीचे आगमन होताच कुटुंबीयांचा आनंद द्विगुणित झाला.

हा क्षण कायम स्मरणात राहावा, यासाठी कुटुंबीयांनी नवजात बालिकेचा जन्मोत्सव अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरविले. आई कल्पना यांच्यासह नवजात बालिकेला आकर्षक पद्धतीने सजवलेल्या रथात विराजमान करण्यात आले. त्यानंतर ढोल-ताशांच्या निनादात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि जल्लोषात शहरातून मिरवणूक काढण्यात आली.

पद्मावती गल्ली परिसरातून निघालेली मिरवणूक इंदिरानगर येथील दहिफळे यांच्या निवासस्थानी पोहोचली. मिरवणुकीत नातेवाईक, मित्रपरिवार आणि आप्तेष्ट मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मार्गावर नागरिकांनीही या अनोख्या सोहळ्याचे कौतुक केले. आनंदोत्सवानिमित्त नागरिकांना जिलेबीचे वाटप करण्यात आले मुलीच्या जन्माकडे आजही काही ठिकाणी दुय्यम दृष्टिकोनातून पाहिले जाते.

Parli News
Dharur News : पावसाअभावी सोयाबीनसह सर्वच पिकांची राखरांगोळी

या पार्श्वभूमीवर दहिफळे कुटुंबाने कन्यारत्नाच्या जन्माचा उत्सव साजरा करून 'मुलीच्या जन्माचे स्वागत करा' आणि 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या विचारांना कृतीतून अधोरेखित केले. 'लेक आली म्हणजे लक्ष्मी आली', या भावनेतून कुटुंबीयांनी हा आनंद सर्वांसोबत वाटून घेतला.

चार पिढ्यांनंतर घरात लेकीचे आगमन झाल्याने दहिफळे कुटुंबासाठी हा सोहळा भावनिक आणि अविस्मरणीय ठरला. मुलगी ही ओझे नसून कुटुंबाचा आनंद आणि समाजाची शक्ती आहे, असा सकारात्मक संदेश या जन्मोत्सवातून देण्यात आला. दहिफळे कुटुंबाच्या या उपक्रमाचे परळीकरांकडून कौतुक होत असून नवजात कन्यारत्नावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news