Crime News : चॉकलेटचे आमिष दाखून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

मुलीने आरडाओरड केल्याने घटना उघडकीस; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Beed News
Beed News : चॉकलेटचे आमिष दाखून अल्पवयीन मुलीवर अत्याचारfile photo
Published on
Updated on

Minor girl sexually assaulted after being lured with chocolate

पाटोदा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील नाळवंडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अंमळनेर पोलिस ठाण्यात संशयित आरोपी बबन काळे (62, रा. नाळवंडी, ता. पाटोदा, जि. बीड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Beed News
Beed Crime | कडा येथे तरुणीशी गैरवर्तन; डॉ. महेंद्र पटवा यांच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक अहिल्यानगर येथील रुग्णालयात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास नाळवंडी शिवारातील पंजाब सय्यद यांच्या बाजरीच्या शेतात ही घटना घडली. संशयित आरोपीने अल्पवयीन पीडित मुलीला चॉकलेट खाण्यासाठी वीस रुपये देण्याचे आमिष दाखवले.

आरोपी हा मुलीच्या घरासमोरच राहत असल्याने त्याची आधीपासूनच ओळख असल्याने मुलीने त्याच्यावर विश्वास ठेवला. याचाच गैरफायदा घेत आरोपी काळे याने तिला बाजरीच्या शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. यावेळी मुलीने मदतीसाठी आरडाओरड केल्याने तिच्या चुलतीने शेताकडे धाव घेतली व तिची सुटका केली. घटनेनंतर आरोपीने तेथून पळ काढत घरात लपून बसला होता. यानंतर संतप्त जमावाने त्याला मारहाण केली. परंतू पोलिसांनी हस्तक्षेप करत त्याला ताब्यात घेतले. आरोपी काळे याच्यावर सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी अंमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी नवले यांच्या आदेशाने पुढील तपास पोउपनि के. के. चव्हाण तपास करीत आहेत.

Beed News
Vilas Ghule Case | विलास घुले खून प्रकरणातील प्रमुख साक्षीदार उमेश माने याला ५ दिवसांची पोलिस कोठडी

काळेवर यापूर्वीचे गुन्हे; पत्नीही सोडून गेली

आरोपी बबन काळे याच्यावर यापुर्वी चोरीचा एक गुन्हा दाखल आहे. तसेच त्याने पत्नीला मारहाण केल्याचा गुन्हा देखील दाखल असून त्याची पत्नी देखील सोडून गेल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. तसेच यापूर्वी त्याने गावातील महिलांची छेडछाड केल्याचे देखील गावकऱ्यांनी सांगितले. अशा मनोविकृताविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

दहा गावांमध्ये बंद

नाळवंडी परिसरातील घटनेनंतर संतापाची लाट उसळली असून परिसरातील आठ ते दहा गावांमध्ये बंद पुकारण्यात आला होता. बुधवारी दिवसभर या गावांमध्ये कडकडीत बंद होता. तसेच गुरुवारी रास्तारोको आंदोलनाचा इशाराही देण्यात आलेला आहे. पोलिसांनी या प्रकरणात मुलीचा जवाब घेतला असून घटनास्थळ पंचनामा देखील केल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक के. के. चव्हाण यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news