केज ते साळेगाव महामार्गावर बर्निंग कारचा थरार

केज ते साळेगाव महामार्गावर बर्निंग कारचा थरार
The thrill of burning car on the Cage to Salegaon highway
केज ते साळेगाव महामार्गावर बर्निंग कारचा थरारPudhari Photo
Published on
Updated on

गौतम बचुटे/केज : पुढारी वृत्‍तसेवा

केज-कळंब रोडवर साळेगाव जवळील एका खाजगी शाळेजवळ चालत्या कारला अचानक आग लागली. या भीषण आगीत पाहता-पाहता कार आगीत भस्मसात झाली.

The thrill of burning car on the Cage to Salegaon highway
Parliament Monsoon Session Live|काँग्रेस देशात अराजकता माजवत आहे; PM मोदींची बोचरी टीका

याबाबतची अधिक माहिती अशी की, (सोमवार) दि.१ जुलै रोजी रात्री ९:१५ वाजण्याच्या सुमारास केज-कळंब रोडवर साळेगाव पासून जवळच असलेल्या विक्रमराव मुंडे लर्न पोतदार स्कूल जवळ एक कार क्र. (एम एच-४४/९४४३) केजकडे जात होती. यावेळी अचानक या कारमधून धूर निघू लागला. कार चालक राजेश घुले यांच्या लक्षात आल्‍यानंतर त्यांनी गाडी रस्त्याच्या बाजुला थांबवली व आतील सर्व प्रवाशी गाडीच्या खाली उतरले.

The thrill of burning car on the Cage to Salegaon highway
पीएम मोदींच्या भाषणादरम्यान लोकसभेत विरोधकांचा गोंधळ

दरम्यान त्या नंतर गाडीने अचानक पेट घेतला व त्यांच्या डोळ्यासमोर गाडी जळून खाक झाली. गाडी पेटल्‍याची माहिती पोलीस निरीक्षक राजेश पाटील यांना मिळताच त्यांनी स्थानिक पत्रकारांच्या मदतीने तहसीलदार सचिन देशपांडे यांना माहिती कळवली. त्‍यांनी आग विझविण्यासाठी केज नगर पंचायतीच्या अग्निशमन विभागाला याची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र या आगीत गाडी जळून भस्मसात झाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news