Navratri 2026 : देवीच्या ज्योतींनी गेवराईचे रस्ते फुलले; नवरात्रीचा भक्तिमय उत्साह शिगेला!

ठिकठिकाणी ज्योत घेऊन परतणाऱ्या तरुणांची लगबग; देवीच्या जयघोषाने परिसर दुमदुमला
Navratri 2026
Navratri 2026 : देवीच्या ज्योतींनी गेवराईचे रस्ते फुलले; नवरात्रीचा भक्तिमय उत्साह शिगेला!file photo
Published on: 
Updated on: 

The streets of Gevrai bloomed with the flames of the goddess; The devotional enthusiasm of Navratri is at its peak!

गजानन चौकटे

गेवराई : नवरात्रोत्सवाचे वेध लागताच गेवराई तालुक्यात भक्तीचा उत्साह दिवसेंदिवस वाढत आहे. देवीची ज्योत आणण्यासाठी विविध शक्तिपीठांकडे रवाना झालेले तरुण आता ज्योत घेऊन परतताना दिसत असून, तालुक्यातील रस्त्यांवर ठिकठिकाणी भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळत आहे. देवीच्या जयघोषात, भक्तिगीतांच्या गजरात आणि श्रद्धेचा महिमा गात तरुणांचा प्रवास सुरू आहे.

Navratri 2026
LPG Price Today : आज गॅस सिलिंडर किती रुपयांना मिळतोय? मुंबईसह प्रमुख शहरांतील दर तपासा!

तुळजापूरची तुळजाभवानी, सप्तशृंगी देवी आणि मोहटादेवी यांसह विविध देवीच्या ठिकाणांहून ज्योत आणण्यासाठी गेवराई तालुक्यातील अनेक तरुणांनी पुढाकार घेतला आहे. ज्योत घेऊन येणाऱ्या या तरुणांमुळे रस्त्यांवर वर्दळ वाढली असून, नवरात्रोत्सवाच्या स्वागतासाठी गावोगावी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मनात देवीवरील अपार श्रद्धा, ओठांवर देवीचा जयघोष आणि हातात भक्तीची ज्योत घेऊन मार्गक्रमण करणाऱ्या तरुणांचे चित्र सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रवासातील अंतर आणि थकवा बाजूला सारून देवीची ज्योत आपल्या गावात आणण्याची ओढ त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.

Navratri 2026
Navratri 2026 : नवरात्रीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ; पाहा काय खावे अन् काय टाळावे?

गेवराई तालुक्यातील मन्यारवाडी येथील २५ तरुणांची टीमही सप्तशृंगी देवीची ज्योत घेऊन परतीच्या प्रवासाला लागली आहे. ८ ऑक्टोबर रोजी ज्योत घेऊन रवाना झालेले हे तरुण रविवार, ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेच्या दिवशी गावात दाखल होणार आहेत.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील वातावरण देवीमय झाले असून, गावोगावी ज्योतींच्या स्वागताची तयारी सुरू आहे. भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा संगम घडवणाऱ्या या उत्साहामुळे नवरात्रोत्सवाची रंगत आणखी वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news