LPG Price Today : आज गॅस सिलिंडर किती रुपयांना मिळतोय? मुंबईसह प्रमुख शहरांतील दर तपासा!

LPG Price Today: घरगुती गॅस सिलिंडरपासून व्यावसायिक सिलिंडरपर्यंत, आजचे दर किती? पाहा संपूर्ण यादी
LPG Price Today
LPG Price Today : आज गॅस सिलिंडर किती रुपयांना मिळतोय? मुंबईसह प्रमुख शहरांतील दर तपासा!file photo
Published on: 
Updated on: 

lpg price today check domestic cylinder rates of different cities

पुढारी ऑनलाईन : LPG Price Today: एलपजी सिलिंडर हा जीवनावश्यक घटक बनला आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरातील वाढीचा परिणाम घरातील बजेटवर होत असतो. त्‍यामुळे याचा परिणाम सर्वसामान्यावर होत असतो. त्‍या पार्श्वभूमीवर सध्याचे एलपीजीचे दर जाणून घ्या..

एलपीजी सिलिंडरच्या किमतीत आज कोणताही बदल नाही; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर पेट्रोल आणि डिझेलप्रमाणेच एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही आज कोणताही बदल झालेला नाही. १४.२ किलोग्रॅमच्या घरगुती सिलिंडरचे आणि १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक सिलिंडरचे दर जुन्या पातळीवरच कायम आहेत.

एलपीजी सिलिंडरच्या किमतीत शेवटची वाढ १ ऑक्टोबर रोजी झाली होती. त्यावेळी व्यावसायिक सिलिंडरचा दर वाढवण्यात आला होता. जून महिन्यापासून घरगुती सिलिंडरची किंमत स्थिर असल्याची माहिती आहे.

LPG Price Today
Surya Gochar 2026 : 'या' ५ राशींना येणार अच्छे दिन; मंगळाच्या नक्षत्रात सूर्य गोचरामुळे होणार मोठा लाभ!

१ ऑक्टोबर रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ६२.५० रुपयांची वाढ झाली होती.

आज घरगुती सिलिंडरचा दर किती? (Domestic Cylinder Price Today)

दिल्ली – ९४२ रुपये

बेंगळुरू – ९४४.५० रुपये

हैदराबाद – ९९४ रुपये

मुंबई – ९४१.५० रुपये

चेन्नई – ९५७.५० रुपये

कोलकाता – ९६८ रुपये

जयपूर – ९४५.५० रुपये

नोएडा – ९३९.५० रुपये

गुरुग्राम – ९५०.५० रुपये

चंदीगड – ९५१.५० रुपये

व्यावसायिक सिलिंडरचा आजचा दर

दिल्ली – २८१० रुपये

बेंगळुरू – २८९८ रुपये

हैदराबाद – ३०६५ रुपये

मुंबई – २७६४.५० रुपये

चेन्नई – २९८३ रुपये

कोलकाता – २९५४ रुपये

जयपूर – २८३९ रुपये

नोएडा – २८१० रुपये

गुरुग्राम – २८२८ रुपये

चंदीगड – २८३३ रुपये

LPG Price Today
How to Peel Boiled Eggs: अंडी उकडण्याची आणि सोलण्याची सर्वात सोपी पद्धत

घरगुती एलपीजीचे उत्पादन वाढवले

युद्धामुळे एलपीजीचा पुरवठा प्रभावित झाला आहे. त्यानंतर भारताने देशांतर्गत स्तरावर एलपीजीचे उत्पादन वाढवण्याचे निर्देश दिले होते. गेल्या महिन्यात केंद्र सरकारने रिलायन्ससह सर्व तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी एलपीजी उत्पादनाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

याशिवाय, देशात एलपीजी सिलिंडरची कमतरता भासू नये यासाठी केंद्र सरकारने नियम अधिक कडक केले आहेत. नवीन नियमांनुसार, आता २५ दिवसांच्या अंतरानेच गॅस सिलिंडर बुक करता येणार आहे. यापूर्वी ग्रामीण भागात ४५ दिवसांचे अंतर निश्चित करण्यात आले होते.

सीएनजीचा दर किती? (CNG Price Today)

दिल्लीमध्ये आज सीएनजी ८६.९८ रुपये, बेंगळुरूमध्ये ९८ रुपये आणि हैदराबादमध्ये ११२ रुपये प्रति किलोग्रॅम दराने विकला जात आहे. मुंबईमध्ये ८८ रुपये, चेन्नईमध्ये ९९.५० रुपये आणि कोलकातामध्ये ९३.५० रुपये प्रति किलोग्रॅम दराने सीएनजीची विक्री होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news