

The political legacy of the daughter-in-law of the Kshirsagar family goes to Sarikatai!
उदय नागरगोजे
बीड : बीडच्या राजकारण, समाजकारणावर ठसा उमटवणाऱ्या क्षीरसागर परिवाराची सून असलेल्या स्व. केशरकाकू क्षीरसागर यांनी आपल्या कर्तृत्वाची झलक देशपातळीवर दाखवली. त्यांच्यानंतर स्व. रेखाताई क्षीरसागर, डॉ. दीपाताई क्षीरसागर यांनी देखील विविध पदे सांभाळली. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत नगर-सेवक म्हणून विजयी झालेल्या डॉ. सारिकाताई क्षीरसागर या स्व. केशरकाकूंचा राजकीय वारसा सक्षमपणे सांभाळतांना दिसताहेत. अगदी नगरसेवक म्हणून विजयी होताच त्यांनी थेट रस्त्यावर उतरत वॉर्डातील कामांना सुरुवात देखील केल्याने याची चर्चा होत आहे.
बीडच्या राजकीय इतिहासात स्व. केशरकाकु यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांची अगदी राजु-रीच्या ग्रामपंचायतपासून सुरू झालेली राजकीय वाटचाल खासदारकीपर्यंत पोहचली. या दरम्यानच्या काळात त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात मोठा दबदबा निर्माण केला होता. स्व. काकू यांच्या नेतृत्व-ाखालीच विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणूका व्हायच्या अन् जिंकल्याही जायच्या. त्यांच्या कार्यकाळात बीडच्या विकासात भर घालणारे विविध प्रकल्पही झाले, त्यामुळेच त्यांचे नाव आजही बीडच्या राजकारणात आदराने घेतले जाते.
त्यांच्या पश्चात पुत्र माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, रविंद्र क्षीरसागर व डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी राजकारणात आपला ठसा उमटवला. स्व. केशरकाकू या क्षीरसागर परिवाराच्या सून होत्या. त्यांचा वारसा पुढे रेखाताई क्षीरसागर व डॉ. दिपाताई क्षीरसागर यांनी चालवला. स्व. रेखाताई क्षीरसागर या जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या तर डॉ. दीपाताई क्षीरसागर यांनी बीडचे नगराध्यक्षपद भुषवले. आता क्षीरसागर परिवारातील सुनेचा राजकीय वारसा डॉ. सारिकाताई योगेश क्षीरसागर या पुढे चालवत असल्याचे दिसते. डॉ. योगेश क्षीरसागर यांनी लढवलेली विधानसभा निवडणूक असो अथवा नुकतीच झालेली नगरपरिषद निवडणूक असो. यामध्ये प्रचाराबरोबरच नियोजनातही डॉ. सारिकाताई क्षीरसागर या सक्रिय असल्याचे पहायला मिळाले.
नगरपालिका निवडणुकीत शहरात विविध प्रभागात प्रचाराची धुरा सांभाळण्याबरोबरच प्रभाग १५ मधून निवडणूक लढवत विजयही मिळवला. नुकतीच त्यांची भाजपाच्या गटनेतेपदी देखील निवड झाली आहे. नगरपालिकेत विजय मिळवताच आता त्यांनी थेट रस्त्यावर उतरत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली असून आगामी काळात त्यांच्या नेतृत्वागुणांची चमक बीडच्या राजकारणात दिसेल एव्हढे मात्र नक्की!
कर्तृत्व पाहूनच संधी मिळते !
राजकारण, समाजकारण अथवा कोणत्याही क्षेत्रात नाव असलेल्या कुटुंबातून पुढे येणाऱ्यांना स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करावे लागते. क्षीरसागर परिवारही याला अपवाद नाही. मी क्षीरसागर परिवाराची सून आहे, म्हणून मला सहज सर्वकाही मिळेल असे नाही. मलाही सामाजीक कार्यात सहभाग घ्यावा लागेल, जनतेच्या अडीअडचणी सोडवाव्या लागतील, तरच संधी मिळू शकेल. आज मी नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर माझ्यावरील जबाबदारी वाढली आहे, आज वॉर्डातील स्वच्छतेच्या कामाची मी पाहणी केली, आवश्यक त्या ठिकाणी स्वच्छता मोहीमही राबवली. आगामी पाच वर्ष हे सातत्य ठेवणार असल्याचे डॉ. सारिकाताई यांनी सांगितले.
नगरपालिकेत मिळणार कर्तृत्वाला वाव !
बीड नगरपालिकेत नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेमलता पारवे या विराजमान झाल्या आहेत. तर पंधरा नगरसेवकांसह भाजपा देखील मोठा पक्षम म्हणून समोर आला आहे. आता काही वेगळी राजकीय घडामोड झाली तर डॉ. सारिकाताईंना उपाध्यक्षपदी संधी मिळू शकते अथवा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून नगरपालिकेत चुणूक दाखवण्याची संधी देखील त्यांच्याकडे आहे. या संधीचे त्या कसे सोने करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.