

परळी : परळीतील नगरपालिका निवडणुकीनंतर निघालेल्या मिरवणुकीत एका महिला उमेदवाराच्या वतीने चक्क नोटा उधळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आता असा प्रकार करणाऱ्या व्यक्तीवर प्रशासन काही कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नुकतीच परळी नगर पालिकेची निवडणूक पार पडली. इथे महायुती म्हणून राष्ट्रवादी,भाजप, शिवसेना व रिपाइं असे सर्व पक्ष एकत्रित लढले होते. तर, कधी काळी मुंडे समर्थक असलेल्या माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश करुन महायुतीला आव्हान दिले होते. विविध आरोप, प्रत्यारोपांमुळे परळी पालिकेची निवडणूक चर्चेची ठरली होती.
यात महायुतीला यश मिळाले. राष्ट्रवादीच्या पद्मश्री धर्माधिकारी विजयी झाल्या. तर राष्ट्रवादीचेही मोठ्या प्रमाणावर नगरसेवक निवडून आले. यात प्रभाग क्रमांक ९ ब मध खैसर रजा खान या विजयी झाल्या. त्यांच्या विजयानंतर प्रभागात विजयी मिरवणूक काढली गेली होती. याच मिरवणूकीत त्यांचे पती राजा खान चांगलाच डान्स केला. समर्थकांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतले. यावेळी बाप तो बाप रहेगा या गाण्यावर नाचताना त्यांनी समर्थकाच्या खांद्यावर बसून काही नोटा उधळल्या. याचा व्हिडीओ आता सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे चर्चा सुरु झाली आहे.