गेवराई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी गेवराई मतदारसंघातून बदामराव पंडित यांना बुधवारी (दि.२३) ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली. त्यांचे नाव जाहीर झाल्यानंतर गेवराई येथे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष व्यक्त केला. (Maharashtra Assembly Election| Badamrao Pandit)
माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांचा गेवराई विधानसभा मतदारसंघांत लोकनेते म्हणून परिचय आहे. या आधी ते तीनवेळा निवडून आले होते. बदामराव पंडित हे शिवसेनेचे (उध्दव ठाकरे गट) ते एकनिष्ठ असून त्यांच्या चांगल्या कामाची पावती मिळाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. (Maharashtra Assembly Election| Badamrao Pandit)