

केज : कोरडेवाडीच्या साठवण तलावासह मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि इतर मागण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या राजश्री राठोड यांचे सहा दिवसा पासून उपोषण सुरू आहे. मात्र त्यांच्या मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याच्या आरोप करीत आंदोलकांनी केज तहसीलच्या दारात पेट्रोल ओतून बैलगाडी पेटवून दिली.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कोरडेवाडी येथे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या राजश्रीताई राठोड या मागील सहा दिवसा पासून बीड जिल्ह्यातील कोरडेवाडी येथे उपोषणाला बसल्या आहेत. मात्र प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत दि.८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३:१५ वाजता धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक बाळराजे आवारे पाटील यांच्या नेतृत्वाखाली केज येथील शासकीय विश्राम गृहापासून आंदोलकांनी बैलगाडीसह मोर्चा काढला. आंदोलकांनी त्यांच्या मागण्यांच्या घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर घेऊन गेले. त्या ठिकाणी आंदोलकांनी त्यांच्या मागण्या संदर्भात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दुपारी ३:३० वा. अचानक सोबत आणलेल्या बैलगाडीचे बैल सोडून बाजूला घेतले आणि बैलगाडीवर पेट्रोल सारखे ज्वलनशील द्रव पदार्थ टाकून बैलगाडी पेटवून दिली. यामुळे आग विझविण्यासाठी प्रशासनाची तारांबळ उडाली.
धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या राजश्रीताई राठोड यांचे पाच दिवसा पासून बीड जिल्ह्यातील कोरडेवाडी तालुका केज येथे उपोषणाला बसल्या आहेत. मात्र प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत दि.८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३:१५ वाजता धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक बाळराजे आवारे पाटील यांच्या नेतृत्वाखाली केज येथील शासकीय विश्राम गृहापासून आंदोलकांनी बैलगाडीसह मोर्चा काढला. आंदोलकांनी त्यांच्या मागण्यांच्या घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर घेऊन गेले. त्या ठिकाणी आंदोलकांनी त्यांच्या मागण्या संदर्भात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अचानक सोबत आणलेल्या बैलगाडीचे बैल सोडून बाजूला घेतले आणि बैलगाडीवर पेट्रोल सारखे ज्वलनशील द्रव पदार्थ टाकून बैलगाडी पेटवून दिली. यामुळे आग विझविण्यासाठी प्रशासनाची तारांबळ उडाली.
१) कोरडेवाडी येथील साठवण तलावास पाणी उपलब्धता प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावे.२) मराठवाड्यात 'ओला दुष्काळ' जाहिर करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रु. सरसकट अर्थिक मदत करण्यात यावी. ३) ज्ञानराधा बँकेच्या ठेवीदारांचे संरक्षण व थकीत रक्कम परत देण्याबाबत. ज्ञानराधा बँकेची स्थावर व जंगम मालमत्ता शासनाच्या ताब्यात घेऊन त्याचा लिलाव करून त्यातून मिळालेल उत्पन्नातून ठेवीदारांचे पैसे तातडीने परत करण्यात यावेत. ४) शेतकरी कर्जमाफी करण्यात यावी आणि ५) शैक्षिणिक फीस माफ करण्यात यावी.
१) दि. ७ ऑगस्ट २०२४ - कोरडेवाडीच्या साठवण तलावाच्या मागणीसाठी राजश्री राठोड यांनी ७ दिवसाचे आमरण उपोषण केले होते.
२)दि. १४ ऑगस्ट २०२४ :- गावकऱ्यांनी कोरडेवाडी ते केज अशी प्रचंड मोठी मोटारसायकल रॅली काढून केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन केले होते. तर जिल्ह्यात मनाई आदेश लागू असताना तो डावलून रस्ता रोको आंदोलन.
३)दि १६ ऑगस्ट २०२४ :- मनाई आदेश डावलून पोलिसांनी रस्ता रोको आंदोलन करणाऱ्या सुमारे ४०० ते ५०० आंदोलकांवर गुन्हा दाखल.
४) दि. ३ ऑक्टोबर २०२५ :- साठवण तलाव, ज्ञानाराधा बँकेच्या ठेवी, दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रु नुकसान भरपाई यासह विविध मागण्यासाठी कोरडेवाडी येथे सहा दिवसा पासून उपोषण सुरू
५) दि. ८ ऑक्टोबर २०२५ :- संतप्त आंदोलकांनी तहसील कार्यालयासमोर पेट्रोल टाकून बैलगाडी पेटविली.
अग्निशामक दलाचा बंब जवळ असताना त्याचा उपयोग नाही :- ज्या ठिकाणी आंदोलकांनी बैलगाडी पेटविली त्याच्या जवळच ५० फूट अंतरावर केज नगर पंचायतीच्या अग्निशामक बंब जवळ होता. परंतु कर्मचारी नसल्यानी पोलिसांनी तहसील कार्यालयातील पाण्याने आटोक्यात आणली.