

केज : केज तालुक्यातील सारणी (सां.) येथे एका मूकबधिर विद्यालयातील शिक्षकाने झाडाला गळफास घेऊन जीवन संपविेले. ही घटना शुक्रवारी (दि.१९) दुपारी १२.३० च्या सुमारास घडली.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अशोक नारायण भंडारे (वय ४६) असे या शिक्षकाचे नाव आहे.
सारणी (सां.) ता. केज येथील अशोक भंडारे हे उमरी फाटा येथील मूकबधिर व मतिमंद निवासी विद्यालयावर शिक्षक होते. ते केज शहरात वास्तव्यास होते. शुक्रवारी ते सारणी (सा.) या आपल्या गावी जात आपल्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेतला. ही बाब गावातील एका व्यक्तीच्या निदर्शास आल्यानंतर त्यांनी नातेवाईकांसह पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. त्यांनी कोणत्या कारणातून टोकाचे पाऊल उचलले याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.