बीड : मृताच्या आईला अंधारात ठेवून मिळविलेल्या वारसा प्रमाणपत्राला स्थगिती!

शिक्षिका सुनेला न्यायालयाचा दणका !
 court
न्यायालयFile Photo
Published on
Updated on

केज/धारूर : पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे वैतागून व मानसिक त्रासाला कंटाळून मागील वर्षी धारूर तालुक्यातील एका शिक्षकाने गळफास घेवून आपले जीवन संपविले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले व वृद्ध आई असताना खोट्या दस्ताऐवजाच्या आधारे जीवन संपविलेल्या मृत शिक्षकाच्या पत्नीने पतीच्या आईला अंधारात ठेवून वारस प्रमाणपत्र मिळवून त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला होता. त्याला मयत शिक्षकाच्या आईने न्यायालयात आवाहन दिल्यानंतर त्या शिक्षिकेला न्यायालयाने चपराक देत सदर वारस प्रमाणपत्र स्थगित ठेवण्याचा आदेश दिला.

 court
बीड : वीज दुरुस्तीचे काम करताना विद्युत खांबावरून पडून तरूणाचा मृत्यू

धारूर तालुक्यातील एका गावातील चंद्रकांत सुरवसे हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षकाने पत्नीच्या अनैतिक संबंधाला त्रासून आणि पत्नी व तिच्याशी अनैतिक संबंध असलेल्या तरूणाच्या मानसिक त्रासाला कंटाळून ५ एप्रिल २०२३ रोजी झाडाला गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली.

त्यानंतर मयत शिक्षकाच्या पत्नीने १९ एप्रिल २०२३ रोजी धारूर न्यायालयात वारस प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करून २७ जून २०२३ रोजी ती स्वतः व त्यांची दोन मुले ही वारस असल्याचे वारस प्रमाणपत्र क स्तर दिवाणी न्यायालय धारूर येथून प्राप्त केले होते. वास्तविक मयत शिक्षकाच्या पश्चात त्यांची आईदेखील अवलंबित होती. मात्र मयताच्या आईचा उल्लेख वारस प्रमाण पत्र मिळविताना त्या शिक्षिकेने केला नव्हता. त्या वारस प्रमाणपत्राला मयत शिक्षकाच्या वृद्ध आईने २६ नोव्हेंबर २०२३ रोजी वकीलामार्फत आवाहन दिले होते. यावर धारूर न्यायालयाने सदर मयत शिक्षकाला जीवन संपविण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप असतानाही मयताच्या पत्नीने त्याच्या आईला आणि न्यायालयाला अंधारात ठेवून व खोटे पुरावे आणि दस्ताऐवज सादर करून मिळविलेल्या वारस प्रमाणपत्राला ५ सप्टेंबर २०२४ रोजी दिलेल्या आदेशाद्वारे मूळ अर्जाचा निकाल लागेपर्यंत स्थगित ठेवण्याचा आदेश दिला आहे.

असा होता घटनाक्रम

  • जानेवारी २०२३ : माजलगाव न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज

  • ५ एप्रिल २०२३ : चंद्रकांत सुरवसे यांनी गळफास घेवून जीवन संपविले.

  • ६ एप्रिल २०२३ : आसरडोह येथे अंत्यसंस्कार

  • ९ एप्रिल २०२३ : धारूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

  • १९ एप्रिल २०२३ : वारस प्रमाण पत्रासाठी न्यायालयात अर्ज

  • २७ जून २०२३ : वारस प्रमाण पत्र मिळाले

  • २३ जुलै २०२३ : पतीला जीवन संपविण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी आणि तिच्या ड्रायव्हर प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

  • २६ सप्टेंबर २०२३ : मयताच्या आईकडून वारस प्रमाण पत्राला न्यायालयात आवाहन

  • ५ सप्टेंबर २०२४ : वारस प्रमाण पत्राला स्थगिती आदेश

 court
बीड : दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांच्या अंभोरा पोलिसांनी मुस्क्या आवळल्या

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news