

Soybeans on fifty acres not grew at all
केज, पुढारी वृत्तसेवाः तालुक्यातील शेलगाव गांजी येथील सुमारे ५० एकर क्षेत्रातील सोयाबीन उगवले नाही. यामुळे आता या शेतकऱ्यापुढे दुबार पेरणीचे संकट उभे टाकले आहे. शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
केज तालुक्यातील शेलगाव गांजी येथील शेतकऱ्यांनी महाबीज कंपनीचे सोयाबीन बियाणे हे पिसुरे कृषी सेवा केंद्र शेलगाव गांजी येथून खरेदी केले. शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्या नंतर २० जून रोजी त्याची पेरणी केली. मात्र आठ दिवस उलटून गेले तरी या बियाणे उगवले नाही. म्हणून दिनांक २७ जून रोजी शेलगाव गांजी येथील शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तक्रार केली आहे.
तक्रार अर्जावर रेवणसिद्ध महालिंग लामतुरे, दत्तात्र मधुकर पटणे, रामराजे लक्ष्मण जाधव, मुकुंद छबुराव साखरे, महादेव श्रीमंत पटणे, राजेभाउ भिमराव जाधव, सुनील आबाराव जाधव, गणपत भानुदास जाधव, सचिन बापूराव जाधव, दत्तात्रय उद्धव खंडागळे, उत्तम बाबुराव जाधव, लक्ष्मण बप्पाजी आकुसकर, अशोक शिवाजी जाधव या तेरा शेजाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यांनी याचा पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
खरेदीच्या बिलावर जीएसटी नंबर नाही: पिसुरे कृषी केंद्रातून खरेदी केलेल्या बियाण्यांच्या पावतीवर लायसन्स नंबर लिहिलेला आहे मात्र त्या पावतीवर जी एस टी नंबर मात्र लिहिलेला नाही.