Beed Crime : सोशल मीडियावरील वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला

सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

गेवराई : सोशल मीडियावरील वादातून एका तरुणावर लोखंडी रॉड, काठी व धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना तालुक्यातील धोंडराई येथे घडली. या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 24 मार्च रोजी सायंकाळी इन्स्टाग्राम ग्रुपवरील वादातून शिवीगाळ झाली होती. या घटनेचा राग मनात धरून 31 मार्च रोजी रात्री सुमारे दहा वाजता संशयितांनी फिर्यादी संदीप कैलास कोकणे (वय 20, रा. धोंडराई) याला घरासमोर गाठले. “इंस्टाग्रामवर शिवीगाळ का केली?” असा जाब विचारत आरोपींनी त्याच्यावर लोखंडी रॉड, लोखंडी पाईप, कोयता व काठ्यांनी हल्ला केला.

Crime News
Sangli Crime : शेतजमिनीच्या वादातून दाम्पत्यास दगडाने मारहाण

या मारहाणीत संदीप कोकणे गंभीर जखमी झाले असून त्याच्या सोबत असलेल्या इतरांनाही मारहाण करून जखमी करण्यात आले. या प्रकरणी रोहित अशोक प्रधान, तेजस लक्ष्मण प्रधान, देविदास लक्ष्मण प्रधान, बाळा प्रकाश प्रधान, संदीप राम प्रधान, पंढरी मधुकर प्रधान आदींसह इतरांविरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक श्रीमती खुळे करीत आहेत.

Crime News
Sangli Crime: मुलगा, सून, नातवासह चौघांकडून वृद्ध दाम्पत्यावर हल्ला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news