Fraud Case : ऑनलाइन पैसे काढताना ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक

धारूरमधील डिजिटल केंद्रांवर ग्राहकांची लूट?; यंत्रणेने कठोर पावले उचलण्याची मागणी
Fraud News
Fraud Case : ऑनलाइन पैसे काढताना ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक(File Photo)
Published on: 
Updated on: 

Senior citizens defrauded while withdrawing money online

धारूर, पुढारी वृत्तसेवा: शासकीय योजनांचे अनुदान, पेन्शन आणि विविध आर्थिक मदतीचे पैसे काढण्यासाठी ऑनलाइन केंद्रांवर जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व अशिक्षित महिलांची फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Fraud News
Beed Crime : १५ लाखांचा गांजा जप्त, एकाला घेतले ताब्यात

बायोमेट्रिक पद्धतीचा (अंगठ्याचा) गैरवापर करून ग्राहकांच्या नकळत त्यांच्या खात्यातून अतिरिक्त रक्कम काढली जात असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. या वाढत्या गैरप्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, प्रशासनाने यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

करताना ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खात्यातून पैसे वजा झाल्याचा मेसेज आल्यानंतर किंवा बँकेत पासबुक एंट्री केल्यावरच अनेक नागरिकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते. मात्र, ही तक्रार नेमकी कोणाकडे करावी-बँकेत, पोलिसांत की संबंधित प्रशासनाकडे?

अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला आणि ग्रामीण भागातील नागरिक ऑनलाइन व्यवहाराच्या तांत्रिक प्रक्रियेबाबत अनभिज्ञ असतात. केवळ खात्यातील शिल्लक (बॅलन्स) तपासण्यासाठी किंवा ठरलेली रक्कम काढण्यासाठी नागरिक आपला अंगठा मशीनवर ठेवतात. मात्र, याचाच गैरफायदा घेत काही केंद्रचालक एकदा अंगठा घेतल्यानंतर दोन वेळा व्यवहार करून किंवा जास्त रक्कम टाईप करून परस्पर पैसे काढून घेत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Fraud News
Shravan Mahotsav Parli : शासनाचा ‘श्रावण महोत्सव’ रसिकांविनाच; दर्जेदार कार्यक्रमाचा प्रसिद्धीअभावी फज्जा!

तांत्रिकदृष्ट्या अंगठा ग्राहकाचाच असल्याने व्यवहार अधिकृत दाखवला जातो, ज्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे सिद्ध याबाबत माहिती नसल्यामुळे अनेक गरीब नागरिक गप्प बसणेच पसंत करतात. सर्वसामान्य आणि निराधार ज्येष्ठ नागरिकांचा हक्काचा पैसा सुरक्षित राहावा यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा धारूर तालुक्यातील नागरिक व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news