Beed Coaching Class Case | कोचिंग क्लास प्रकरणातील संशयित माझ्या जवळचे असले तरी...; संदीप क्षीरसागर यांचा खुलासा

Sandeep Kshirsagar | मी तुमच्या सारखे गायब नव्हतो, धनंजय मुंडेंना टोला
Sandeep Kshirsagar
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर (Pudhari Photo)
Published on
Updated on

Sandeep Kshirsagar on Beed Coaching Class Case

बीड: बीडमधील एका शैक्षणिक संकुलात विद्यार्थिनीसोबत लैंगिक छळ झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली. येथील एका शैक्षणिक संकुलात अल्पवयीन विद्यार्थीनीला क्लासेसच्या केबीनमध्ये बोलावून तिचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात प्रा. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांना शनिवारी मध्यरात्री अटक केली होती. दरम्यान, या प्रकरणी आपल्यावर आरोप झाल्यानंतर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

ते म्हणाले की, प्रथम ही घटना दुर्दैवी आहे. याबाबत संशयितांना अटक करण्यात आलेली आहे. संशयित माझ्या जवळचे असले तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी माझी मागणी आहे. माझे कॉल तपासलेच पाहिजे, माझी त्यासाठी पूर्ण सहमती आहे. त्याचबरोबर सगळे सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले आहेत, ते पोलिसांकडे आहेत. पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी दहा दिवस लागले नाहीत. मी जरी आमदार असलो आणि संशयित माझ्या जवळचे असले तरी, ज्या दिवशी तक्रार दाखल झाली, तेव्हाच गुन्हा दाखल झाला आहे.

Sandeep Kshirsagar
Beed Crime News : अत्याचार प्रकरणातील आरोपी क्षीरसागरांच्या निकटचा, माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा आरोप

साहजिक आहे, त्यांची बाईट पाहिल्यावर मंत्रिपद गेल्याचे दुःख दिसत आहे. मी तुमच्या सारखे गायब नव्हतो, असा टोला यावेळी क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव न घेता लगावला. ते पुढे म्हणाले की, बीडचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. एखादी घटना घडली तर ते मागेपुढे पाहत नाही, असा अजित पवार यांचा स्वभाव आहे. मी त्यांना पत्र देणार आहे. जे काय काम सुरू आहे, पोलीस काम करत आहेत, ते व्यवस्थित सुरू आहे, असे क्षीरसागर म्हणाले.

त्या कोचिंग क्लासच्या मालकाला आमदार संदीप क्षीरसागर पदोपदी मदत करायचे? त्यांचा राजाश्रय होता का? या प्रकरणातसुद्धा सक्त कारवाई होणे गरजेचे आहे. सगळ्या CDR ची तपासणी झाली पाहिजे, अशी मागणी कोचिंग क्लासमधील अत्याचार प्रकरणाबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्सवर पोस्ट करून केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news