Beed News : अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात धारूर, केजमध्ये रिपाइंचे आंदोलन

प्रक्रिया तात्काळ थांबवण्याची मागणी; तहसीलदारांना निवेदन सादर
Beed News
Beed News : अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात धारूर, केजमध्ये रिपाइंचे आंदोलनfile photo
Published on
Updated on

Ripai's agitation in Dharur, Cage against SC sub-categorization

धारूर / केज, पुढारी वृत्तसेवाः महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरणाबाबत सुरू असलेली प्रक्रिया थांबवावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने सोमवारी धारूर व केज येथे आंदोलन करण्यात आले. दोन्ही ठिकाणी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आली.

Beed News
Parli lightning strike: परळीत १३२ केव्ही सबस्टेशनवर वीज कोसळली; अनेक तास अंधार

केंद्र सरकारचे सामाजिक न्याय मंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पप्पूजी कागदे यांच्या निर्देशानुसार राज्यभर आंदोलन सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. धारूर येथे तालुकाध्यक्ष धोंडीराम सिरसट यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

शासनाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयामुळे अनुसूचित जाती समाजात संभ्रम निर्माण होऊन सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असल्याचा दावा करत हा निर्णय तातडीने रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली. तहसीलदारांनी निवेदन स्वीकारून शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली. केज येथे तालुकाध्यक्ष दीपक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

Beed News
Parli Crime | मुलीवर घरात घुसून हल्ला केलेल्या तरुणाने परळीत गळफास घेऊन जीवन संपविले

आंदोलनादरम्यान बोलताना कांबळे यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा निर्णय हा समाजात तेढ निर्माण करणारा असून तो तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली. तसेच उपवर्गीकरणाच्या संदर्भात सोशल मीडियावर जातीय तेढ निर्माण करणारे संदेश व रील्स प्रसारित करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली.

धारूर येथील आंदोलनात लक्ष्मण सिरसट, किशोर गायसमुद्रे, महादेव गायसमुद्रे, संदीप डोंगरे, शाहीर वारकरी, बंटी (भैय्या) गायसमुद्रे, राजेश सोनवणे (सरपंच), अरविंद गायसमुद्रे, संजय सिरसट, रवी शिंदे, शंकर गांधले, जिजा सिरसट, श्याम हजारे, रजनीकांत सिरसट यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

केज येथील आंदोलनात जिल्हा संघटक रवींद्र जोगदंड, जिल्हा उपाध्यक्ष राहुल सरवदे, तालुका सरचिटणीस गौतम बचुटे, ज्येष्ठ नेते दिलीप बनसोडे, तालुका उपाध्यक्ष प्रशांत हजारे, आयटी सेल अध्यक्ष सूरज काळे, युवा रिपाइंचे पदाधिकारी तसेच पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news