

केज : केज येथे एका सेवा निवृत्त सहाय्यक फौजदार आणि त्यांच्या मुलाला रिकाम्या जागेवर अतिक्रमण करण्याच्या कारणावरून सात जणांनी टिकाव आणि खोऱ्याच्या दांड्यानी मारहाण केली आहे. ही घटना बुधवारी (दि.9) केज येथील सेवा निवृत्त सहाय्यक पोलीस फौजदार जकियोद्दीन इनामदार व त्यांचा मुलगा रजियोद्दिन इनामदार हे घरी असताना सायंकाळी ४:०० वा. च्या सुमारास घडली. इनामदार यांनी त्याच्या घराचे समोरील सर्वे नं. ८३ मध्ये त्यांनी पत्र्याचे शेड उभे केले आहे. त्याच्या दक्षिण दिशेला रिकाम्या जागेत पत्र्याचे शेड उभे करण्याच्या उद्देशाने पूर्व तयारीनिशी खलील बाबामिया इनामदार, कैफ खलील इनामदार, अफसर खलीली इनामदार, सैफ खलीली इनामदार हे मोटार सायकलवर हातात दांडे घेवुन आणि एका ट्रक्टर क्र. (एम एच-४४/५७८६) स्वराज कंपनिचा ट्रॅक्टर व त्यास ट्राली जोडुन ट्रालीमध्ये पत्रे लोखंडी अँगल घेवुन आले.
यानंतर त्यांनी ते साहित्य सर्वे नं. ८३ मधील रिकाम्या जागेत टाकुन अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करीत असताना जकीयोद्दीन इनामदार व त्यांचा मुलगा रजियोद्दीन इनामदार यांनी त्यांच्या जागेत पत्रे अँगल हे साहित्य का टाकले ? असे विचारले असता; खलील इनामदार त्यांना म्हणाले की, तुझी कशाची जागा आहे ? असे म्हणुन शिवीगाळ केली आणि गच्चीला धरुन लाथाबुक्याने व चापटाने मारहाण केली. तर ईतर लोकांनी त्यांच्या हातातील टिकावाचे खोऱ्याचे दांड्यानी घेवुन दोघा बाप-लेकांना मारहाण केली. रजियोद्दीन इनामदार याला अफसर इनामदार याने त्याचे हातातील दांड्याने मारुन मुक्का मार देवुन जखमी केले.
या प्रकरणी सेवा निवृत्त सहाय्यक फौजदार जकीयोद्दीन इनामदार यांच्या तक्रारी वरून खलील इनामदार, कैफ इनामदार, अफसर इनामदार, सैफ इनामदार आणि इतर तिघे अशा सात जणांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार श्रीकांत चौधरी हे करीत आहेत.