Beed News : ‘बावनकुळेंच्या सूचनेवरून प्रमाणपत्र रद्द नाही’; रेखा अंबुरे प्रकरणात प्रशासनाचे स्पष्टीकरण

जरांगे यांच्या आरोपानंतर बीड जिल्हा प्रशासनाचे पत्र
Rekha Ambure Kunbi certificate controversy
मनोज जरांगे पाटीलpudhari photo
Published on
Updated on

बीड : बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील नगरसेविका रेखा अंबुरे यांचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी हे प्रमाणपत्र मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेवरून रद्द करण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यावर बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यानी महसूल मंत्र्यांच्या विशेष कार्याधिकाऱ्यांना पत्र लिहून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचना किंवा पत्रावरून सदर प्रमाणपत्र रद्द झालेले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात काही कुणबी प्रमाणपत्रे रद्द झाल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री बावनकुळे यांच्या सूचनेवरून सदर प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याचा आरोप केला होता. याच विषयावरून मनोज जरांगे यांनी मंत्री बावनकुळे यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जहरी टीका केली होती.

Rekha Ambure Kunbi certificate controversy
Mumbai Ganeshotsav 2026: गणेश मंडपांचे स्ट्रक्चरल ऑडिट बंधनकारक!

यासर्व पार्श्वभूमीवर आता बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यानी महसूल मंत्र्यांच्या विशेष कार्याधिकाऱ्यांना पत्र देऊन रेखा अंबुरे यांचे जात प्रमाणपत्र हे मंत्री बावनकुळे यांच्या शिफारशी किंवा सूचनेवरून रद्द झालेले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

काय आहे प्रकरण ?

माजलगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत रेखा अंबुरे यांनी इतर मागासप्रवर्गासाठी राखीव प्रभागातून निवडणूक लढविली होती. त्यासाठी त्यांनी कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र सादर केले होते. त्या प्रभागामधून त्या निवडून आल्या. त्यानंतर पराभूत उमेदवार सुमन मुंडे यांनी रेखा अंबुरे यांच्या जात प्रमाणपत्राला जात पडताळणी समितीसमोर आव्हान दिले होते. त्यावर सुनावणी झाल्यानंतर जात पडताळणी समितीने सदर प्रमाणपत्र रद्द केले.

यासाठी रेखा अंबुरे कुणबी असल्याचे स्पष्ट करणारे पुरेसे पुरावे नाहीत. तसेच वंशावळ सिद्ध होत नाही, असे निष्कर्ष नोंदविले होते. त्यादरम्यान रेखा अंबुरे यांनी भूमिअभिलेख किंवा महसूल दप्तरी नसलेले काही कागद आपल्या घरी सापडले आहेत आणि त्याची शपथपत्राआधारे शासनाच्या संकेतस्थळावर नोंद घ्यावी यासाठी अर्ज केले होते. त्या प्रक्रियेची चौकशी करावी, अशी मागणी करणारे निवेदन सुमन मुंडे यांनी महसूल मंत्र्यांना दिले होते.

Rekha Ambure Kunbi certificate controversy
Pune Crime: वडापावसाठी गेला अन् जीव गमावला; पायाला धक्का लागल्याच्या वादातून पुण्यात तरुणाचा खून

त्यावर महसूल मंत्र्यांनी संकेतस्थळावर कागदपत्रे अपलोड करण्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रशासनाला निर्देशित केले होते. आता मनोज जरांगे हे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामुळेच रेखा अंबुरे यांचे प्रमाणपत्र रद्द झाल्याचा आरोप करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news