Railway Job Scam | रेल्वेत नोकरीच्या आमिषाने परळीतील तरुणाची तब्बल २४ लाखांची फसवणूक

खोटे नियुक्तीपत्र, ट्रेनिंग, मेडिकल अशा सर्व प्रक्रियेचा बनाव रचला
Job fraud case
नोकरीचे आमिष दाखवून फसवणूकFile Photo
Published on
Updated on

परळी वैजनाथः रेल्वे खात्यात नोकरी लावतो म्हणून नियुक्तीपत्र, ट्रेनिंग, मेडिकल अशी सर्व प्रक्रिया पार पडल्याचे भासवत, परळी वैजनाथ येथील २१ वर्षीय महादेव भरत मुंडे या युवकाची तब्बल २४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संभाजीनगर परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार,

महादेव मुंडे यांचे शिक्षण सुरू असून ते कुटुंबासमवेत पंचशीलनगर, परळी येथे राहतात. नोव्हेंबर २०२३ मध्ये त्यांचे वडिलांचे ओळखीचे असलेले काशीनाथ भानुदास घुगे (रा. शिवाजीनगर, परळी) यांनी त्याला रेल्वे खात्यात नोकरी लावतो असे सांगून विश्वासात घेतले. ५ डिसेंबर २०२३ रोजी ते महादेवला दिल्लीला घेऊन गेले व तेथे त्याचे मेडिकल करण्यात आले.

यानंतर, सचिन नारायण वंजारे (रा. परळी) यांच्या खात्यावर दोन दिवसात एकूण १ लाख रुपये पाठविण्यात आले. त्याच्या मोबदल्यात महादेवला रेल्वेच्या गेटमन पदाचे बनावट नियुक्तीपत्र दिले गेले. पुढे अमृतसर येथे जाऊन ट्रेनिंगची प्रक्रिया सुरू झाली. परंतु नंतर, रेल्वे क्वार्टर मिळवण्यासाठी आणखी ३ लाख रुपये मागण्यात आले. महादेवच्या वडिलांनी आपल्या खात्यातून ९० हजार रुपये काशीनाथ यांना पाठवले. अमृतसर येथे सुरजसिंह नावाच्या इसमाशी संपर्क करून गेट क्र. २६ वर ट्रेनिंग सुरू झाली.

Job fraud case
Beed News : परळी शहरातील गजबजलेल्या चौकात अंधश्रद्धेला खतपाणी; हळदीकुंकू टाकून कोंबड्याचा दिला बळी

पुढील टप्प्यात महादेवकडून संजय ठाकूर, मनिष यादव, एस. के. सिंग या व्यक्तींनी वेळोवेळी संपर्क करून ५० हजार ते ६ लाखांपर्यंतची रक्कम मागून घेतली. या शिवाय, महादेवच्या मामाकडून आणि आजोबांकडून त्याच्या चुलत मामासाठी "टीसी" पदावर नोकरी लावण्यासाठी तब्बल ₹14,70,000 रुपये उकळण्यात आले. यातून काही रक्कम स्वतः महादेवच्या खात्यातून व वडिलांच्या खात्यातून प्रेमकुमार यांच्या खात्यावर पाठवली.अशी तब्बल २४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली.

खोट्या ऑर्डरचा असा झाला पर्दाफाश

महादेवचे चुलत मामा, दिल्लीतून मिळालेली नियुक्तीपत्र घेऊन मुंबई CSTM येथे DMR ऑफिसमध्ये जॉईन होण्यासाठी गेले. मात्र, तेथील अधिकाऱ्यांनी ही ऑर्डर बनावट असल्याचे स्पष्ट केल्यानंतर सर्व प्रकाराची पोलखोल झाली.

या सर्व प्रकारानंतर महादेव मुंडे यांनी संभाजीनगर, परळी वै. पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून, काशीनाथ घुगे, सचिन वंजारे (रा.परळीवैजनाथ), संजय ठाकूर (रा.दिल्ली), सुरजकुमार सिंग(अमृतसर,पंजाब), या संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे हे करीत आहेत.

Job fraud case
Beed Political News : अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वेमार्गाला गती द्या : उपमुख्यमंत्री अजित पवार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news