Beed News : सुनेत्रा पवारांवरील टीकेच्या निषेधार्थ परळीत सपकाळांविरोधात आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन; काँग्रेस विरोधात घोषणाबाजी
Beed News
Beed News : सुनेत्रा पवारांवरील टीकेच्या निषेधार्थ परळीत सपकाळांविरोधात आंदोलनfile photo
Published on
Updated on

Protest against Sapkal in Parli over criticism of Sunetra Pawar

परळी, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत झालेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ परळी वैजनाथ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. यावेळी काँग्रेस पक्षा विरोधात घोषणाबाजी करून जाहीर निषेध नोंदविण्यात आला.

Beed News
Beed Crime : पेठ बीड पोलिसांची गोमांस विक्रीवर कारवाई; ७५ किलो गोमांस जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी करण्यात आलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. तसेच हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणात संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी त्या भूमिकेचे समर्थन केल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला. यासोबतच धनंजय मुंडे यांच्याबाबतही सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.

Beed News
Beed Municipal Politics : बीड नगरपालिकेच्या सत्तेवर राष्ट्रवादीचीच ‘घडी’ पक्की!

या निषेध आंदोलनात गटनेते वैजनाथ सोळंके, शहराध्यक्ष आयुब पठाण, सरचिटणीस अनंत इंगळे, गोविंद कराड, नगरसेवक दीपक मुंडे, लक्ष्मण मुरकुटे, भीमराव डावरे, जयराज देशमुख, अजीज कच्ची, माजी नगरसेवक शकील कुरेशी, दत्ताभाऊ सावंत, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र परदेशी, रमेश भोईटे, शंकर कापसे, दीपक कुरील, अजीम नवाब, रवी मुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news