Beed Crime : पेठ बीड पोलिसांची गोमांस विक्रीवर कारवाई; ७५ किलो गोमांस जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

एकूण 15 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

बीड : राज्य सरकारने गोहत्या व गोमांस विक्रीवर बंदी घातली असतानादेखील बीडमध्ये काही ठिकाणी चोरीछुपे गोमांस विकले जात असल्याची गुप्त माहिती पेठ बीड पोलिसांना मिळाली असता त्यांनी तत्काळ गोमांस जप्त करत कारवाई केली.

पेठ बीड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोवंशाची बेकायदेशीर कत्तल करून गोमांस विक्रीसाठी साठा केल्याप्रकरणी पेठ बीड पोलिसांनी धडक कारवाई करत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत 75 किलो गोवंशाचे मांस, लोखंडी सत्तूर, चाकू व वजनकाटा असा एकूण 15 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Crime News
Latur Jal Jeevan Mission : जलजीवनच्या निधीसाठी खंडापूर गावकऱ्यांचे भीक मागो आंदोलन

याप्रकरणी पोलिस अंमलदार शिवाजी एकनाथ राख यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी म्हणून आवेज पाशा कुरेशी (वय-31) व खालेद कटटु कुरेशी (वय-45, दोघे रा. कुरेशी मोहल्ला, मोमिनपुरा, बीड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई रविवारी दुपारी कडबा मंडीसमोर, जुना मटण मार्केट व मच्छी मार्केटच्या बाजूला, रविवार पेठ, पेठ बीड येथे करण्यात आली. ही कारवाई पोलिस निरीक्षक नीलेश केळे यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक नित्यानंद उबाळे, पोलिस हवालदार नितीन राठोड, हनुमंत उगले, पोलिस अंमलदार अल्ताफ शेख, शिवाजी राख तसेच चालक नवले यांच्या पथकाने केली.

Crime News
Trisha Krishnan Row | डीएमकेच्या रॅलीमध्ये नेमकं काय घडलं होतं? काय म्हणाले होते उदयनिधी स्टॅलिन, कथित वक्तव्याबद्दलचं प्रकरण काय?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news