

Proposal for the construction of a railway station in Ambajogai
अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा : आंबाजोगाई येथे नवीन रेल्वे स्टेशन उभारण्यात यावे, या मागणीसाठी रेल्वे सल्लागार सदस्य डॉ. आदित्य पतकराव यांनी 26 नोव्हेंबर रोजी पुणे मंडल रेल्वे विभागाच्या बैठकीत 22 पानी सविस्तर प्रस्ताव सादर केला. पुणे मंडलाचे मंडल रेल्वे प्रबंधक राजेश कुमार वर्मा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अनिल पाठक यांच्यासह संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांकडे हा प्रस्ताव सुपूर्द करण्यात आला.
आंबाजोगाई शहरासह परिसरातील नागरिकांची रेल्वे प्रवासाची गरज, व्यापार, शिक्षण, आरोग्य सेवा, दळणवळण आणि भविष्यातील विकासाच्या दृष्टीने नवीन रेल्वे स्टेशनची आवश्यकता स्पष्ट करण्यात आली आहे. यात घाटनांदूर-श्रीगोंदा या जुन्या मागणी सह परळी- मुरुड, परळी-धराशिव किंवा बार्शी २६.११.२०२६ डी. आर. एम. कॉन्फ्रेस हॉल, या पर्यायी मार्गाची मांडणी ही करण्यात आली आहे.
प्रस्तावाची दखल घेत रेल्वे प्रशासनाने सकारात्मक भूमिका दर्शवली असून, हा प्रस्ताव दक्षिण मध्य रेल्वेकडे पाठवून पुढे रेल्वे बोर्ड व रेल्वे मंत्रालयाकडे सादर करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिल्याची माहिती डॉ. पतकराव यांनी दिली.
दरम्यान डिसेंबर 2026 मध्ये स्वतः रेल्वे मंत्रालयात जाऊन हा प्रस्ताव सादर करणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. आंबाजोगाई येथे रेल्वे स्टेशन उभारल्यास शहरासह परिसरातील अनेक गावांना दळणवळणाची सुविधा उपलब्ध होऊन विकासाला चालना मिळू शकते. त्यामुळे या मागणीसाठी आता रेल्वे प्रशासनासह केंद्र सरकारच्या स्तरावरही पाठपुरावा होणार आहे.