Beed News : अंबाजोगाईत अकरा लाखांचा ऐवज पळवला

अंबाजोगाई शहरातील रविवार पेठ परिसरातील बाराभाई गल्ली येथील एका व्यापाऱ्याचे घर चोरट्यांनी फोडून घरात धाडसी चोरी करत ११ लाखांची चोरी केल्याचे समोर आले आहे.
Ambajogai Crime News
Beed News : अंबाजोगाईत अकरा लाखांचा ऐवज पळवलाPudhari Photo
Published on
Updated on

Property worth eleven lakh rupees was stolen in Ambajogai

अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा :

अंबाजोगाई शहरातील रविवार पेठ परिसरातील बाराभाई गल्ली येथील एका व्यापाऱ्याचे घर चोरट्यांनी फोडून घरात धाडसी चोरी करत ११ लाखांची चोरी केल्याचे समोर आले आहे. घडलेल्या या धाडसी घरफोडीमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरून परिसरात खळबळ उडाली आहे.

Ambajogai Crime News
Beed Crime News : कर्ज फेडण्यासाठी चक्क सोनाराला लुटले

घराचे कुलूप तोडून आत शिरलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ११ लाख ७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. घरफोडीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या सीसीटीव्ही च्या आधारेच घरमालक मोहम्मद अलीमुद्दीन कारीमुद्दीन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

मोहम्मद अलीमुद्दीन यांचा किराणा मालाचा व्यवसाय असून ते आपल्या कुटुंबासह एपीजे अब्दुल कलाम शादीखाना शेजारी त्यांचे घर असून दि. २८ जानेवारी रोजी सकाळी आपल्या घराला कुलूप लाऊन ते आपल्या कुटुंबासह पाथरी येथे त्यांच्या मुलाच्या घराचे चालू असलेले बांधकाम पाहण्यासाठी गेले होते. घराला लावलेले कुलूप पाहून व त्यावर पाळत ठेवून चोरट्यांनी २९ जानेवारीच्या मध्यरात्री १:२५ वाजेच्या सुमारास दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला.

Ambajogai Crime News
Dharur Ghat Accident : धारूर घाटात वाहनातून ऑईल गळती; अनेक दुचाकी घसरून अपघात

घरात प्रवेश करून त्यांनी घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम यावर डल्ला मारून त्यांनी पोबारा केला. दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांच्या दुकानातील कामगाराने घर उघडे असल्याचे फोनवरून कळवले. त्यानंतर मोहम्मद अलीमुद्दीन हे घरी आल्यानंतर त्यांना आपली घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली.

चोरट्यांनी घरातील कपाटे फोडून सोन्याचे गंठण, नेकलेस, अंगठ्या, बांगड्या आणि चेन असे सुमारे ८ लाख ७ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. तसेच कपाटात ठेवलेली ४ लाख रुपयांची रोकडही चोरून नेली. घर मालकाच्या तक्रारी वरून अंबाजोगाई शहर पोलिसांनी घटनास्थळा जावून तेथील घडलेल्या घटनेचा पंचनामा केला असून गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news