कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू

जिल्हा कारागृहात आठ दिवसांपूर्वी दाखल झालेल्या कैद्याला शनिवारी सकाळी छातीत दुखत असल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
beed crime news
कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराने मृत्यूFile photo
Published on
Updated on

Prison inmate dies of heart attack

बीड, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा कारागृहात आठ दिवसांपूर्वी दाखल झालेल्या कैद्याला शनिवारी सकाळी छातीत दुखत असल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला रुग्णालयात दाखल केले असता सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

beed crime news
Crime News : तिकीट वाटपावरून भाजप पदाधिकाऱ्यावर हल्ला

गणेश पवार (५०, रा. सुभाष रोड बीड) असे मृत्यू झालेल्या कैद्याचे नाव आहे. गणेश पवार यांच्यावर २०१८ मध्ये चेक बाऊन्सच्या संदर्भातील बीड जिल्हा कारागृह वर्ग गुन्हा दाखल झालेला होता. त्याच्या सुनावणीला ते उपस्थित राहत नसल्याने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

beed crime news
Jalna Crime | हेल्यांच्या टकरीतून वाद; हाणामारीत पोटात वार झाल्याने नवविवाहित तरुणाचा मृत्यू

शनिवारी सकाळी गणेश पवार यांनी छातीत दुखत असल्याचे कारागृह कर्मचाऱ्याला सांगितले. यानंतर तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी उपचार सुरु असतांना त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, या घटनेची माहिती कारागृह अधिक्षक रामराजे चांदणे यांना मिळाल्यानंतर त्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. यानंतर जिल्हा न्यायाधीशांनी कारागृहात भेट दिली. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news