Parli Vaijnath Theft Case | नव्या घरी गुढी उभारायला गेले, अन् जुन्या घरात चोरट्यांनी मारला डल्ला; परळीत खळबळ

Parli Vaijnath Theft Case | परळी वैजनाथ शहराच्या जुन्या गावभागातील आंबेवेस परिसरात चोरीची घटना घडली असून या घटनेत लाखो रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत.
theft case
theft casePudhari
Published on
Updated on

परळी वैजनाथ : पुढारी वृत्तसेवा

परळी वैजनाथ शहराच्या जुन्या गावभागातील आंबेवेस परिसरात चोरीची घटना घडली असून या घटनेत लाखो रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. नवीन घरात गुढी उभारण्यासाठी डांगे गल्लीतून खंडोबा गल्लीत गेल्यानंतर चोरट्यांनी संधी साधून हा डल्ला मारला आहे.

theft case
Shirgaon Lairai Jatra 2026 Goa | 21 एप्रिलला भरणार लईराईची जत्रा! 10 एप्रिलपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे आमदार प्रेमेंद्र शेट यांचे आदेश

परळी वैजनाथ शहरातील आंबेवेस परिसरातील डांगे गल्ली येथे एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना घडली आहे. १८ मार्चच्या रात्री ही घरफोडी झाली असून, १९ मार्च रोजी ही बाब उघडकीस आली.

पुरुषोत्तम चोथवे हे गुढीपाडव्यानिमित्त घराला कुलूप लावून खंडोबा मंदिर परिसरातील आपल्या दुसऱ्या घरी गेले होते. हीच संधी साधून चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

theft case
Goa Assembly Election | 2027 साली कोण उभारणार सत्तेची गुढी?

कपाटातील सोन्याची अंगठी, कानातील फुले, पुंगळे मणी, टॉपर, पट्टी गंठण, चांदीची चैन आणि पाच हजार रुपयांची नगदी असा खरेदी वेळेच्या किमतीनुसार एकूण दीड लाखाचा तर आजच्या सोन्याच्या बाजारभावा नुसार सहा ते सात लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news