परळीतील तौहीद उर्फ अफजलखान पठाण खून प्रकरण : पोलिसांकडून तपासातील वास्तविकता जाहीर

जातीय किंवा सामुदायिक कटाचा रंग देऊ नये- बीड पोलिसांचे आवाहन
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

परळी वैजनाथ : परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या अफजलखान उर्फ तौहीद खेरातीखान पठाण याच्या खून प्रकरणाचा तपास बीड पोलिसांकडून अत्यंत बारीक पुराव्यांसह सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी ऋषिकेश परमेश्वर फड व गौरव दीपक व्यास यांना आधीच अटक केली आहे.

Crime News
NEET paper leak case Nashik | नीट' पेपरफुटी प्रकरणाला नवे वळण, शुभम खैरनारच्या फ्लॅटची तपासणी

मद्यप्राशन आणि आर्थिक वाद हेच कारण पोलिसांनी उपलब्ध भौतिक व तांत्रिक पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि परिस्थितीजन्य पुराव्यांचे सखोल विश्लेषण केले आहे. मृत व्यक्ती आणि आरोपी हे एकमेकांच्या परिचयाचे होते. मद्यप्राशन केल्यानंतर त्यांच्यात आर्थिक व्यवहारातून वाद निर्माण झाला आणि त्यातूनच ही घटना घडली हेच आत्तापर्यंतच्या तपासादरम्यान समोर आले असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Crime News
NEET Paper Leak Nashik Connection | नीट पेपरफुटीचे 'नाशिक कनेक्शन' उघड! पाथर्डी फाटा परिसरातून शुभम खैरनारला अटक

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

सोशल मीडियावर या घटनेबाबत अनेक संदेश, व्हिडिओ क्लिप्स आणि दावे प्रसारित केले जात आहेत. काही घटकांकडून या घटनेला जातीय, सामुदायिक किंवा संघटित गुन्हेगारीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. मात्र, आतापर्यंतच्या तपासात आणि पुराव्यांवरून या गुन्ह्याचा जातीय किंवा सामुदायिक बाबींशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांनी सोशल मीडियावर दिशाभूल करणारी माहिती किंवा अफवा पसरवू नयेत, ज्यामुळे सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्थेला बाधा येईल. अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन बीड पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे. या प्रकरणात आणखी कोणाचाही सहभाग आढळल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news