Beed Crime : जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

परळी : तालुक्यातील जिरेवाडी येथे बेकायदेशीररीत्या तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या अड्ड्यावर परळी ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रकमेसह मोबाईल, दुचाकी असा एकूण 4 लाख 90 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4.45 वाजण्याच्या सुमारास जिरेवाडी येथील शेतातील पत्र्याच्या उघड्या शेडमध्ये काही जण तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार परळी ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला. यावेळी स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना पैसे लावून जुगार खेळताना आठ जण आढळून आले.

Crime News
Latur Illegal Moneylending : सावकाराने बळकावलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत

पोलिसांनी घटनास्थळावरून 19 हजार 330 रुपये रोख रक्कम, विविध कंपन्यांचे मोबाईल, तीन दुचाकी आणि जुगारासाठी वापरण्यात येणारे पत्ते असा एकूण 4 लाख 90 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सहायक पोलीस निरीक्षक पागोटे यांनी दोन पंचांच्या उपस्थितीत जप्ती पंचनामा केला. याप्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक शिवरक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार पोकळे पुढील तपास करीत आहेत. परळी ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगार अड्डयांवर सुरू असलेल्या हालचालींना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Crime News
Latur Illegal Moneylending : सावकाराने बळकावलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.