Parali Maratha Bhavan | छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य: नगरपरिषदेकडून परळीत मराठा भवनसाठी 28 गुंठे जागा हस्तांतरित!

सकल मराठा समाजाच्या वतीने आमदार धनंजय मुंडे व नगराध्यक्ष सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांचा सत्कार
Parali Maratha Bhavan
Parali Maratha Bhavan
Published on
Updated on

परळी वैजनाथ : परळी वैजनाथ शहरात मराठा भवन उभे राहावे अशी गेल्या अनेक वर्षांपासून ची मराठा समाज बांधवांची मागणी होती. मराठा भवन साठी 28 गुंठे जागा देण्यात आली आहे. स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधत आज माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करत ही जागा मराठा भवनसाठी हस्तांतरित करण्यात आली आहे.

वैद्यनाथ मंदिर परिसरात नंदागौळ रस्त्यावर वेताळ मंदिराच्या बाजूला असलेली 28 गुंठे जागा मराठा भवनसाठी नियोजित करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून परळी मध्ये मराठा भवन असावे अशी मराठा समाजाची आग्रही मागणी होती. आता मराठा भवनसाठी ही जागा हस्तांतरित करण्यात आली आहे.लवकरात लवकर सुसज्ज मराठा भवन उभे राहील अशी भूमिका मराठा समाज बांधवांनी व्यक्त केली.

या अनुषंगाने आज संबंधित ही 28 गुंठे जागा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात आली. यावेळी स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन व नियोजित मराठा भवनच्या नाम फलकाचे अनावरण आ.धनंजय मुंडे, नगराध्यक्ष सौ पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी, न. प. गटनेते वैजनाथ सोळंके, नगरसेवक व्यंकटेश शिंदे, श्रीकृष्ण कराड, शंकर कापसे, देवराव लुगडे, नितीन शिंदे, सेवकराम जाधव, प्रल्हाद सुरवसे, शिवाजी देशमुख, बाबा शिंदे, महादेव गंगणे, गिरीश भोसले, राजेंद्र सोनी आदींसह सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी परळीत देखणे मराठा भवन उभे राहील असा विश्वास मराठा समाज बांधवांनी व्यक्त केला. मराठा भवनसाठी ही जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीने आमदार धनंजय मुंडे व नगराध्यक्ष सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. सकल मराठा समाजाच्या वतीने परळी नगर परिषदेचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news