Parali Cattle Smmugling | परळीतील गोवंश तस्करीची हद्दच झाली !

Beed Crime News | गुन्हा दाखल झालेल्‍या ठिकाणाहून मध्यरात्री उचलल्या आठ गाई : संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद
Beed Crime News
परळी येथे दोन दिवसांपूर्वीच गुंगीचे औषध देऊन गाईंच्या तस्‍करीचा प्रयत्‍न झाला होता. Pudhari Photo
Published on
Updated on

परळी वैजनाथ : गोवंश तस्करीची मोठी संघटित टोळी परळी व परिसरात कार्यरत असल्याचे अनेक प्रकार वेळोवेळी पुढे आले आहेत. दोन दिवसापूर्वीच परळीच्या स्नेहनगर भागात गाईंवर विष प्रयोग करून गाईंची तस्करी करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी पशुसंवर्धन मंत्र्यांनीही दखल घेऊन गुन्हा दाखल करायला लावला होता. मात्र आता या तस्करीची हद्दच झाली असुन एक प्रकारे सर्वच यंत्रणांना आव्हान देत पुन्हा त्याच स्नेहनगर भागातून दोन गाड्यांमधून आठ गाईंना क्रूरपणे मारून व डांबून त्यांची तस्करी करण्यात आली. हा प्रकार काल मध्यरात्री घडला. तस्करीचा हा संपूर्ण प्रकार स्पष्टपणाने सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. यामुळे पुन्हा एकदा गोवंश तस्करी, परळीतील गुन्हेगारी व पोलिसांची कार्यपद्धती हे मुद्दे ऐरणीवर आले आहेत.

Beed Crime News
Beed Cow Smuggling | खळबळजनक : गायींना घातल्या गुंगीच्या गोळ्याः डांबून ठेऊन तस्‍करीचा प्रयत्न

परळी वैजनाथ येथील स्नेहनगर या भागामध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वीच गाईंवर विष प्रयोग करून त्यांना डांबून चोरून घेऊन जाण्याचा प्रकार अयशस्वी झाला होता. या भागातील नागरिकांनी सतर्कता दाखवल्यामुळे तस्करीचा हा डाव उधळला गेला होता. परंतु हे संपूर्ण प्रकरण राज्यभर गाजले. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या पर्यंत हे प्रकरण गेले. त्यानंतर अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. मात्र आता त्याच स्नेहनगर भागात बिनदिक्कतपणे पुन्हा असाच प्रकार पुढे आला असुन काल मध्यरात्रीच्या सुमारास या भागातून आठ गाई क्रूरपणे मारहाण करून त्यांना डांबून दोन गाड्यांमधून चोरून नेल्या असल्याचा प्रकार सीसीटीव्ही फुटेज मधून दिसून येत आहे.

Beed Crime News
खळबळजनक ! कडबनवाडी येथे गोवंश जनावरांची प्रचंड कत्तल; चौदाशे किलो मांस जप्त

यामुळे प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. स्नेह नगर भागात काळ्या रंगाच्या झायलो गाडीतून तीन दिवसांपूर्वी गोवंश तस्करीचा प्रकार उघड झाला होता. याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. मात्र याची तमा न बाळगता एक प्रकारे पशुसंवर्धन मंत्री, पोलीस व संबंधित सर्वांनाच आव्हान देत तस्करी करणाऱ्या टोळीने जाणीवपूर्वक याच भागात जाऊन इनोव्हा आणि सेंट्रो गाड्यातून या गाई डांबून चोरून नेल्याचे समोर आलेल्या सीसीटीव्ही मधून स्पष्ट दिसत आहे. दरम्यान याप्रकरणी स्नेहनगर मधील नागरिक सीसीटीव्ही फुटेज घेऊन पोलीस ठाण्यात दाखल झाले. या प्रकरणाचा मुळापर्यंत तपास करून दोषीवर कडक कारवाई करावी अशी मागणी या नागरिकांनी केली आहे. याप्रकरणी पोलीस सीसीटीव्ही फुटेज व अन्य गोष्टी तपासून गुन्हा दाखल करणार असल्याचे परळी पोलिसांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news