Crime Newsfile photo
बीड
Crime News: पंकजा मुंडेंच्या PA च्या पत्नीने जीवन संपवले; कुटुंबीयांचा हत्येचा आरोप, लग्नाच्या काही महिन्यांतच नेमकं काय घडलं?
मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक (PA) अनंत गर्जे यांच्या पत्नीने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Crime News
मुंबई: भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक (PA) अनंत गर्जे यांच्या पत्नीने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉ. गौरी अनंत गर्जे असे तिचे नाव आहे. ही आत्महत्या नसून तिची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप मृत विवाहितेच्या कुटुंबीयांनी केला आहे.
९ महिन्यांपूर्वीच अनंत गर्जे यांचा गौरी यांच्यासोबत विवाह झाला होता. अनंत गर्जे यांचे बाहेर अफेअर असल्याने ती अस्वस्थ होती, असो आरोप गौरीच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेनंतर तिचे कुटुंबीय संतप्त झाले असून त्यांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. न्याय मिळवण्यासाठी आणि हत्येची चौकशी व्हावी यासाठी कुटुंबीय वरळी पोलीस स्थानकात दाखल झाले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया देखील वरळी पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

