Pankaja Munde | “…म्हणून आता मी पण डॉक्टर झाले आहे” : पंकजा मुंडे

Maha Pashudhan Expo Parli | परळी वैजनाथ येथील महा पशुधन एक्सपोचा बक्षीस वितरणाने समारोप
Maha Pashudhan Expo 2026
Maha Pashudhan Expo 2026 Pudhari
Published on
Updated on

Maha Pashudhan Expo 2026

परळी वैजनाथ : परळी वैजनाथ येथे १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या देशपातळीवरील महा पशुधन एक्सपोचा समारोप उत्साहात पार पडला. तीन दिवस चाललेल्या या प्रदर्शनातून अनेक पशुपालकांनी आधुनिक तंत्रज्ञान, विविध योजना आणि उद्योगांविषयी माहिती घेत पशुसंवर्धन क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त केला.

समारोप प्रसंगी विविध स्पर्धांतील विजेत्या पशुपालकांना पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते तब्बल १ कोटी ७० लाख रुपयांची पारितोषिके वितरित करण्यात आली. स्मृतीचिन्ह, पदक आणि रोख रक्कम असे पारितोषिकांचे स्वरूप होते. कार्यक्रमास पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., आयुक्त प्रवीण कुमार देवरे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Maha Pashudhan Expo 2026
Advantage Maha. Expo-2026 : देशी-विदेशी बाराशे कंपन्यांची एक्स्पोसाठी बुकिंग

यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, पशुसंवर्धन विभागात कार्यरत असलेले अधिकारी आणि कर्मचारी उच्चशिक्षित, संशोधक वृत्तीचे आणि अत्यंत संवेदनशील आहेत. “मुक्या प्राण्यांशी जिव्हाळ्याचे नाते जोडून त्यांची काळजी घेणारे हे खरे अर्थाने डॉक्टर आहेत. नुकतीच मला डॉक्टरेट पदवी मिळाली. माझ्या विभागातील सर्व डॉक्टरांना साजेशी ओळख म्हणून आता मीही डॉक्टर झाले आहे,” असे त्यांनी हलक्याफुलक्या शब्दांत सांगितले.

मंत्र्यांनी पशुपालकांच्या मेहनत, अनुभव आणि ज्ञानाचा विभागाच्या विविध योजना व उपक्रमांमध्ये प्रभावीपणे उपयोग केला जाईल, अशी ग्वाहीही दिली.

Maha Pashudhan Expo 2026
Devendra Fadnavis | माय अन् माती हेच आमचं व्हॅलेंटाईन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२५ वर्षांनंतर मैदान पुन्हा सजले

या एक्सपोचे आयोजन ज्या मैदानावर करण्यात आले, त्याबद्दलची वैयक्तिक आठवणही पंकजा मुंडे यांनी सांगितली. तब्बल २५ वर्षांनंतर हे मैदान इतक्या रचनात्मक आणि आकर्षक पद्धतीने सजवले गेले असल्याचे त्यांनी नमूद केले. सजावट, भोजनव्यवस्था, पंगती आणि एकूणच नियोजन अत्यंत सुरेख होते, असे त्या म्हणाल्या.

याच मैदानावर सुमारे २५ वर्षांपूर्वी त्यांच्या विवाहावेळीही अशीच भव्य व्यवस्था करण्यात आली होती, अशी हृदयस्पर्शी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news