

One injured in assault in Beed
गौतम बचुटे/केज
शेतातील बोअरच्या पाण्याच्या मोटारीच्या स्टार्टरच्याच पेटीला कुलुप कुणी लावले ? म्हणून फायटरने व काठीने मारहाण करून एकाला जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज तालुक्यातील बेलगाव येथील जालिंदर सोनबा बैले यांचे आरणगाव ता. केज येथील शिवारात जागा असलेल्या ठिकाणी बोअर घेतलेला आहे. त्याच्या शेजारी असलेली बहिण गंधेराबाई गोवर्धन सावंत हिने त्या बोअरच्या मोटारीला स्टार्टर बसविले आहे.
दि. १ मे रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास जालिंदर बैले हे बोअर चालु करण्यासाठी गेले असता, स्टाटर बॉक्सला कुलुप लावलेले होते. म्हणून त्यांनी त्यांच्या बहिणीला विचारले की, कुलुप कोणी लावले आहे ? तेव्हा तिने माहित नाही असे म्हणताच तिचा मुलगा राजेश गोवर्धन सावंत आणि रोहित लक्ष्मण सोनवणे, संकेत राजेश सावंत व कल्पना राजेश सावंत हे सर्वजण बाहेर आले. त्यांनी जालिंदर बैले यांना शिवीगाळ करत मारहाण सुरु केली.
संकेस राजेश सावंत याने हातातील फायटरने त्यांच्या डाव्या कानाला पाठीमागील बाजुस मारले. त्यामुळे रक्त निघु लागले. ते जोरात ओरडल्यामुळे त्यांचा मुलगा अजित हा भांडण सोडविण्यासाठी आला असताना त्याला पण सर्वांनी लाथा-बुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. त्या नंतर जिवे मारण्याच्या धमक्या देत ते निघुन गेले.
जालिंदर बैले यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात राजेश गोवर्धन सावंत, रोहित लक्ष्मण सोनवणे, संकेस राजेश सावंत आणि कल्पना राजेश सावंत या चौघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू वंजारे हे करीत आहेत.