

Omkar Sugar Factory rates Rs. 3050 per MT
परळी, पुढारी वृत्तसेवा: दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या संकल्पनेतून उभारलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आता रूपांतरित होऊन ओंकार साखर कारखाना (युनिट क्र. ८, पांगरी) या नावाने कार्यरत आहे. कारखान्याच्या २०२५-२६ गळीत हंगामासाठीचा ऊस दर जाहीर करण्यात आला असून, प्रति मेट्रिक टन ३०५० रुपये असा आकर्षक दर घोषित करण्यात आला आहे.
आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही अधिकृत घोषणा कारखाना प्रशासनाने केली. पहिला आणि दुसरा हप्ता जाहीर चेअरमन बाबुराव बोथरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित केलेल्या दरानुसार प्रति मे.टन ३०५० रु. अधिकृत दर पहिला हप्ता : २९५० रु. प्रति मे.टन दीपावलीसाठी अतिरिक्त १०० रु. प्रति मे.टन कारखाना व्यवस्थापनाच्या निर्णयामुळे यंदाच्या हंगामात पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
हंगामी दरातील स्थैर्य, वेळेवर आर्थिक तरतूद आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिलेले बोनस लाभ यामुळे या वर्षी शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. हंगाम २०२५-२६ मध्ये ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना टनेजनुसार मोफत साखर वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जनरल मॅनेजर वैभव व्ही. काशीद यांनी दिली. दिवाळीपूर्वी हा लाभशेतकऱ्यांना मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कारखान्याचा शेतकऱ्यांवर विश्वास कायम
ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सातत्यपूर्ण सहकार्य आणि विश्वास हेच आमचे बळ आहे. पुढेही शेतकरी हिताचाच विचार करून सर्वोत्तम निर्णय घेण्यास कारखाना कटिबद्ध राहील, अशी ग्वाही ओंकार साखर कारखाना प्रशासनाने दिली.