Beed News : आष्टी भूमिअभिलेख कार्यालयातील कारभाराला चाप बसणार का ?
Ashti Land Records Office News
कडा, पुढारी वृत्तसेवा आष्टी तालुक्यातील भूमिअभिलेख कार्यालयाचा कारभार गेल्या काही महिन्यांत नागरिकांच्या सहनशीलतेची अंत झाला होता. प्रभारी उपाधीक्षक असल्याने त्यांचा कोणावर वचक नसल्यामुळे शेकडो फेरफार, मोजण्या, नकाशे, वारस नोंदी, गुंठेवारी, अकृषी असे अनेक प्रलंबित प्रकरणांची साखळी तयार झाली होती.
कार्यालयात कोणाचाच कोणावर वचक नसल्याने "काम उद्यापरवानंतर या। अश्या एका वाक्यावर कार्यालयाचा कारभार उभा राहिला होता. आता उपअधीक्षक मोरे सी. एस. यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नवीन आशेचा किरण नागरिकांना दिसू लागला आहे. परंतु मोरे यांच्या आगमनाने कार्यालयाचा गाडा पुन्हा गतिमान होणार का? की काही दिवसांतच पुन्हा तीच जुनी टोलवाटोलवी, सव्हर बंदची सबब, शिपायाचा हस्तक्षेप आणि राजकीय दबाव सुरू राहणार का? हा मोठा प्रश्न आहे मागील उपअधीक्षकांच्या काळात भूमी अभिलेख विभागात गेले काही महिने विविध तक्रारी, कामकाजातील विलंब, नागरिकांची होण ारी गैरसोय आणि व्यवहार प्रलंबित राहिल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. कोणाचाच कोणावर वचक नव्हता आता पुणे येथून पदोनती
होऊन आलेले या क्षेत्रात २१ वर्षांचा प्रदीर्घ अनुभवी असलेले नवीन अधिकारी मोरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्वाच्याच नजरा आता त्यांच्या कामकाजावर लागल्या आहेत. जुनी अडचण, अपार कामाचा ताण आणि शिस्तबद्धतेचा अभाव या तिघांशी दोन हात करताना मोरे यांनी कारभारात पारदर्शकता व गती आणणे हेच खरे आव्हान ठरणार आहे. नागरिकांना दिलासा देणारा कारभार सुरू होणार का? कागदोपत्री कामकाजातील विलंबाला लगाम बसणार का? अनियमिततेवर कारवाई होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढील काही दिवसांत स्पष्ट होतील. स्थानिक जनतेत मात्र सकारात्मक बदलाची अपेक्षा वाढली आहे.

