

Pawan Karwar attack
माजलगाव: ओबीसी नेते पवन करवर यांच्यासह तीन मित्र माजलगाव तालुक्यातील माली पारगाव ते सावरगाव दरम्यान जेवण करत असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. ही घटना मंगळवारी (दि.२३) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
त्यांच्यासोबतचे तीन मित्र उसाच्या शेतात जाऊन लपल्याने त्यांना मार लागला नाही. घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते. माजलगाव तालुक्यातील माली पारगाव ते सावरगाव दरम्यान ओबीसी नेते पवन करवर हे एका हॉटेलवर जेवण करण्यासाठी थांबले होते. त्याचवेळी त्या ठिकाणी आलेल्या ४० ते ५० तरुणांनी करवर यांच्यावर काठीने प्राण घातक हल्ला केला.
त्यांच्यासोबत असलेले तीन मित्र उसाच्या शेतात जाऊन लपल्याने त्यांना मार लागला नाही. सदरील घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बालक कोळी यांनी घटनास्थळी भेट देऊन उसाच्या शेतात लपलेल्या करवर यांच्या सहकाऱ्यांना सुखरूप बाहेर काढले. तर करवर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान ओबीसी नेते पवन करवर हे दि. २४ सप्टेंबर रोजी जालना येथे होत असलेल्या ओबीसी आंदोलनासाठी जात असताना ही घटना घडली.