

केज :- बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात मांजरा नदीवर असलेल्या धनेगाव येथील धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सहा दरवाजे ०.२५ मिटरने उघडले आहेत.
मांजरा धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे व धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने दि. २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६:०० वाजता धरणाच्या सांडव्याची ६ वक्रद्वारे क्र.१, २, ३, ४, ५ आणि ६ क्रमांकाचे दरवाजे हे ०.२५ मीटरने उघडले आहेत. त्या सहा वक्र दरवाजातून मांजरा नदी पात्रात ५२४१.४२ क्युसेक्स (१४८.४४ क्युमेक्स) इतका विसर्ग सूरू आहे.
मांजरा काठच्या लोकांना दक्षतेचा इशारा :- मांजरा धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे किंवा कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येईल.त्यामुळे मांजरा नदी काठावरील आणि पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी. असे आवाहन मांजरा प्रकल्प धनेगाव पुर नियंत्रण कक्षाद्वारे कळविण्यात आले आहे.