Beed News: नेकनूर येथील रुग्णालयाशेजारील कचरा डेपो व धुरामुळे रुग्णांच्या जीवितास धोका; पोलिसांत तक्रार

नेकनूर येथील स्त्री व कुटीर रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीशेजारीच ग्रामपंचायतीकडून टाकण्यात येणारा कचरा आणि तो उघड्यावर पेटवून दिल्याने धूरामुळे रुग्णालय परिसरात गंभीर आरोग्य संकट निर्माण झाले आहे.
Garbage Burning
Garbage BurningFile Photo
Published on: 
Updated on: 

नेकनूर : नेकनूर येथील स्त्री व कुटीर रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीशेजारीच ग्रामपंचायतीकडून टाकण्यात येणारा कचरा आणि तो उघड्यावर पेटवून दिल्याने पसरणारा विषारी धूर यामुळे रुग्णालय परिसरात गंभीर आरोग्य संकट निर्माण झाले आहे. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी महिनाभरापूर्वी लेखी पत्र देऊनही ग्रामपंचायतीने कचरा डेपो हटवला नसल्याने, अखेर या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात एका नागरिकाने लेखी तक्रार दाखल केली आहे.

नेकनूर येथील बाजार परिसर, नदीपात्र तसेच स्त्री व कुटीर रुग्णालयाच्या कंपाउंडजवळ मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व इतर घनकचरा टाकला जात आहे. हा कचरा उघड्यावर पेटवून दिला जात असल्याने विषारी धुराचे लोट थेट रुग्णालयात शिरत आहेत. यामुळे रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण, नवजात बालके, गरोदर माता, वयोवृद्ध नागरिक आणि रुग्णांच्या नातेवाईकांना श्वसनाचे गंभीर विकार होण्याची तसेच त्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

Garbage Burning
Beed News : अंबाजोगाईत रेल्वे स्टेशन उभारणीसाठी प्रस्ताव

याचबरोबर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना आणि बाजारात येणाऱ्या लोकांनाही या धुराचा त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात नागरिकांनी तसेच रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी महिनाभरापूर्वीच ग्रामपंचायतीला लेखी पत्र देऊन कचरा डेपो तातडीने हटवण्याची आणि कचरा जाळण्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाने या पत्राला कोणताही प्रतिसाद दिला नाही. परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने अखेर सय्यद जाहेद सय्यद जमील यांनी नेकनूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.

‘रुग्णालय हे जीव वाचवण्याचे ठिकाण आहे. तिथेच विषारी धूर आणि कचऱ्याचे साम्राज्य असेल, तर रुग्ण बरे कसे होणार?’ असा सवाल नागरिक करत आहेत. तातडीने कचरा डेपो अन्यत्र स्थलांतरित करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

Garbage Burning
Beed News : लग्नाचे आमिष दाखवून बीड येथे तरुणीवर अत्याचार; लष्करात कार्यरत जवानाचे कृत्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.