

अंबाजोगाई : अंबाजोगाई नगर परिषद निवडणुकीत भाजपा पुरस्कृत अंबाजोगाई शहर परिवर्तन जनविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नंदकिशोर शिवबगस मुंदडा हे २२ हजार ७७७ मतांचे मताधिक्य घेऊन विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार मोदी राजकिशोर कांताप्रसाद यांना २० हजार २८० मिळाले आहेत.
दोघांनीही आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याचे शहरात दिसून आले. नंदकिशोर मुंदडा यांनी माझी शेवटची निवडणूक असल्याचे सांगत मतदारांना भावनिक साद दिली होती. तर राजकिशोर मोदी यांनी आपण मागील २५ वर्षात केलेल्या विकास कामावर मतदान मागितले. नंदकिशोर मुंदडा यांचे ११ नगरसेवक निवडणूक आले आहेत. राजकिशोर मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार व अजित पवार), आरपीआय, मनसे पूरस्कृत तयार केलेल्या लोकविकास महाआघाडीच्या ३१ नगरसेवकांपैकी २० नगरसेवक निवडून आले आहेत.