

गेवराईः गेवराई नगरपरिषदेची बहुचर्चित निवडणूक दि. २ रोजी अनेक आरोप. प्रत्यारोप ने पार पडली. संपूर्ण महाराष्ट्र चे लक्ष आता गेवराई नगरपरिषद कडे आहे . त्या दिवसानंतर मतपेट्यांमध्ये बंद झालेले उमेदवारांचे भवितव्य आता रविवार, दि. २१ रोजी उघड होणार आहे. निकालाच्या क्षण-जवळ येत असतानाच संपूर्ण गेवराई शहरात जोरदार राजकीय हालचालींना वेग आला असून नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि धाकधूक वाढली आहे.
शहरातील प्रत्येक प्रभागात चर्चा रंगताना दिसून येत आहेत. चहा टपऱ्या, चौक, गल्लीबोळ, बाजारपेठा सध्या “कोण जिंकणार?” या एकाच प्रश्नाने गजबजलेल्या आहेत. निवडणुकीदरम्यान प्रचारात उतरलेली सर्वच दिग्गज मंडळी आता शांत असली तरी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर प्रतीक्षेची अधीरता स्पष्टपणे जाणवत आहे.
मतमोजणी प्रक्रिया कडक सुरक्षेमध्ये पार पडणार असून प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्र परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला असून पोलीस दल सज्ज ठेवण्यात आले आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईस सुरुवात झाली आहे.
शहरवासीयांसाठी आगामी रविवार हा केवळ निकालाचा दिवस नसून गेवराईच्या पुढील राजकारणाची दिशा ठरवणारा ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. सत्ता बदल होणार की विद्यमान नेतृत्व पुन्हा विश्वासार्ह ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेवराई शहरातील राजकीय भविष्य आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे.