
केज : केज तालुक्यात पुन्हा एका चोवीस वर्षीय गतिमंद तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली आहे. मागील दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे. दोन दिवसा पूर्वीच अशाच एका गतिमंद तरुणीवर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली होती.
या बाबतची माहिती अशी मी, दि. ४ जुलै रोजी दुपारी ३:०० च्या सुमारास केज तालुक्यातील एक दिव्यांग आणि गतिमंद असलेली तरुणी ही घरात एकटीच होती. आरोपी बाळू कांबळे याला हे माहीत होते त्याने घरात घुसून त्या दिव्यांग आणि गतिमंद तरूणीचा विनयभंग केला.
या प्रकरणी पीडित तरुणीच्या चुलतीच्या फिर्यादी वरून आरोपी बाळू कांबळे याच्या विरुद्ध गु. र. नं. ३६०/२०२५ भा. न्या. सं. ७४ के, ३३३ यासह अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम ९२ (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शेळके आणि सहाय्यक पोलिस उपनिक्षक सोनवणे हे तपास करीत आहेत.
दरम्यान दोनच दिवसा पूर्वी दि. २ जुलै रोजी केज तालुक्यात अशीच एक घटना घडलेली आहे. एका गतिमंद तरुणीवर गावातील एकाने गोठ्यात लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. यातील आरोपीला गावकऱ्यांनी पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले होते. , , ,