Beed Crime : अत्याचार प्रकरणातील आरोपींना पाच जुलैपर्यंत पोलिस कोठडी

उमाकिरण’ कोचिंगमधील प्रकारामुळे पालकवर्गात संताप
Minor girl molestation case
प्रातिनिधिक छायाचित्र(File Photo)
Published on
Updated on

बीड : बीड शहरातील ‘उमाकिरण’ नावाच्या खासगी कोचिंग क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या विनयभंग व लैंगिक शोषण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या विजय पवार, प्रशांत खाटोकर आणि अजय बचोरे यांना न्यायालयाने पाच जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाने जिल्ह्यातील शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आणला असून, पालकांमध्येही तीव्र संतापाचे वातावरण आहे.

मुख्य आरोपी विजय पवार याने कोचिंग चालवण्याच्या आड विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन केल्याचा, तसेच शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या धैर्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले असून, तिने पोलिसांकडे तक्रार दाखल करताच पोलिसांनी तात्काळ तिन्ही आरोपींना अटक केली. पोलिसांनी न्यायालयात केलेल्या सादरीकरणात, हे लैंगिक शोषण केवळ एकदाच झाले नसून, वेळोवेळी मुलीवर मानसिक दबाव टाकून तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न झाला असल्याचे नमूद केले आहे.

पोलिसांनी न्यायालयात स्पष्टपणे सांगितले की, तिन्ही आरोपींना एकत्र बसवून सखोल चौकशी करणे अत्यावश्यक आहे. तसेच, पीडित विद्यार्थिनीचा ‘इन कॅमेरा’ जबाब नोंदवण्याच्या प्रक्रियेसाठी देखील कोठडीची आवश्यकता आहे. या मागण्या ग्राह्य धरून न्यायालयाने पाच जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली. प्राथमिक तपासात इतर विद्यार्थिनींशी संबंधित आणखी काही बाबींचा उलगडा होण्याची शक्यता असून, पोलिस तपासाचे स्वरूप आता अधिक गंभीर झाले आहे.

उपसभापतींकडून दखल

या प्रकरणाची दखल स्वतः राज्य विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी घेतली असून, विशेष पोलिस महानिरीक्षकांना पत्र पाठवून आरोपींवर कठोर कारवाई आणि इतर कोचिंग क्लासेसची सुरक्षा तपासणी करण्याची मागणी केली आहे. अल्पवयीन विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणासारख्या प्रकारांना रोखण्यासाठी शासनाने ‘शून्य सहनशीलता’ धोरण राबवले पाहिजे, अशीही अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील पुढील तपास व आरोपींविरोधातील कारवाई कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news