Beed Political News : खा. सोनवणेंनी घेतली जरांगे यांची भेट

मराठायोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी १ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य करा अन्यथा २९ ऑगस्टला मुंबईत आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे.
Beed Political News
Beed Political News : खा. सोनवणेंनी घेतली जरांगे यांची भेटFile Photo
Published on
Updated on

MP Sonawane met Jarange at Antarwali Sarati

बीड, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मराठायोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी १ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य करा अन्यथा २९ ऑगस्टला मुंबईत आंदोलन करण्याची भूमिका घेतली असून या पार्श्वभूमीवर खा. बजरंग सोनवणे यांनी २५ जून रोजी सांयकाळी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.

Beed Political News
Beed : विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी क्लासेस चालकासह शिक्षकावर गुन्हा

यावेळी मराठा आरक्षण आंदोलनावर दोघांत सविस्तर चर्चाही झाली. या प्रसंगी माजी मंत्री राजेश टोपे व माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते मोहन जगताप हे उपस्थित होते. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश तत्काळ लागू करावा, हैद्राबाद, सातारा व बॉम्बे गॅझेटियर लागू करून त्यावर अंमलबजावणी करावी, 'सगे-सोयरे' अधिसूचनेची तत्काळ अंमलबजावणी करावी, मराठा आरक्षणातील आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घ्यावेत, मराठा आंदोलनातील बलिदान दिलेल्या कुटुंबांना नोकरी व आर्थिक मदत द्यावी, न्या. शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी, संतोष देशमुख हत्या आणि कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी.

जर हे निर्णय १ ऑगस्टपर्यंत घेण्यात आले नाहीत, तर २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मोठे आंदोलन करण्याचा स्पष्ट इशारा या पत्रात देण्यात आला आहे. दरम्यान, खा. बजरंग सोनवणे यांनी मराठा समाजाच्या सर्व न्याय मागण्यांचे निवेदन योग्य त्या पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करू, असेही यावेळी म्हटले आहे.

Beed Political News
Dharur Tanker Accident : घाटात उलटला गोडतेलाचा टँकर, दोन तास वाहतुकीची कोंडी; अपघाताचे सत्र सुरूच

मराठा आरक्षण लढ्यात आपण सोबत असून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी लढत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी संपूर्ण मराठा समाज ताकदीने उभा असल्याचा विश्वासही यावेळी त्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news