Dharur Tanker Accident : घाटात उलटला गोडतेलाचा टँकर, दोन तास वाहतुकीची कोंडी; अपघाताचे सत्र सुरूच

आंध्रप्रदेशातील जंगारेड्डी येथून २४ टन तेल घेऊन येणारा टँकर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास धारूर घाटातून जात होता.
Dharur Tanker Accident
Dharur Tanker Accident : घाटात उलटला गोडतेलाचा टँकर, दोन तास वाहतुकीची कोंडी; अपघाताचे सत्र सुरूचFile Photo
Published on
Updated on

Dharur oil tanker overturns at ghat, traffic jam for two hours

अतुल शिनगारे

धारूर : खामगाव-पंढरपूर पालखी मार्गावरील धारूर घाटाचे रुंदीकरण रखडलेले आहे. यासाठी १७१ कोटींचा निधीदेखील मंजूर झाला परंतु प्रत्यक्षात काम कधी सुरू होणार? हा प्रश्न कायम आहे. या दरम्यान अपघाताचे सत्र सुरूच असून गुरुवारी दुपारी ब्रेक निकामी झाल्याने तेलाची वाहतूक करणारा टैंकर घाटात पलटला. यामुळे जवळपास दोन तास वाहतुकीची कोंडी झाली होती. अपघाताचे हे सत्र सुरूच असून रुंदीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी होत आहे.

Dharur Tanker Accident
Beed News | पावसाची ओढ आणि वन्यप्राण्यांचा धुमाकूळ; केज तालुक्यातील बळीराजा तिहेरी संकटात

आंध्रप्रदेशातील जंगारेड्डी येथून २४ टन तेल घेऊन येणारा टँकर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास धारूर घाटातून जात होता. दरम्यान अचानक टँकरचे ब्रेक फेल झाल्याचे चालक माणिक दासरे यांच्या लक्षात आले. समोरून मोठ्या प्रमाणात वाहने येत होती. तसेच रेन-ाखडी परभणी येथील शंभरच्या जवळपास वारकऱ्यांची दिंडीही रस्त्यावरून जात होती. ही बाब चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने टैंकर ३० फूट उंच डोंगरावर घातला. डोंगर उतार असल्यामुळे टैंकर पलटी होऊन तो रस्त्यावर आडवा पडला.

यावेळी वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती. पंढरपूरकडे जाणारी दिंडीही या ठिकाणी अर्धा तास कॉडीमुळे थांबली होती. टँकरमधील पामतेलची गळती झाल्यामुळे घाट रस्त्यात घसरगुंडी झाली. तेल रस्त्यावर पडल्याने दुचाकी चालवणे कठीण झाले होते. ऐन धोकादायक वळणाच्या ठिकाणी हा अपघात झाल्याने बसेसदेखील थांबल्या होत्या.

Dharur Tanker Accident
Beed : विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी क्लासेस चालकासह शिक्षकावर गुन्हा

घटनेची माहिती कळताच पोलिस निरीक्षक देविदास वाघमोडे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन सोबत घाटामध्ये वारकऱ्यांना सुरक्षित घाटाच्या वर मार्ग काढून दिल्यानंतर चार चाकी, दुचाकी वाहने काढून देत ट्राफिक थोडी थोडी कमी करत दोन तासांनंतर वाहतूक कोंडी सुरळीत झाली. मालवाहू गाड्या व बस यांची कोंडी उशिरापर्यंत होती. अपघातात चालक माणिक दासरे हे किरकोळ जखमी होते.

त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आला. दरम्यान, खामगाव पंढरपूर मार्गाचे काम पूर्ण होत असतानाच या घाटाचे रुंदीकरण होणे गरजेचे होते, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी या ठिकाणी अपघाताचे सत्र सुरूच आहे. नुकतेच या कामासाठी १७१ कोटी रुपये मंजूर झाल्यानंतर नेत्यांमध्ये श्रेयासाठी स्पर्धा लागली होती. त्याच नेत्यांनी आता काम प्रत्यक्षात सुरू होण्यासाठी देखील पाठपुरावा करावा, अशी मागणी आता नागरिकांमधून केली जात आहे.

घाटातून जात होती दिंडी

खामगाव-पंढरपूर हा पालखी मार्ग असून या मार्गावरून शेकडो दिंड्या पंढरपूरकडे जात आहेत. गुरुवारी दुपारी देखील परभणी जिल्ह्यातील दिंडी या मार्गावरून जात असताना हा अपघात झाला. चालकाने प्रसंगावधान राखत टैंकर डोंगराकडे बळबल्याने दुर्घटना टळली. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news